APMC Market: मुंबई आणि उपनगरात भाज्यांचे दर गगनाला भिडले, घाऊक बाजार आवारातच भाजीपाल्याच्या दरात तफावत

| Updated on: Dec 23, 2021 | 1:00 AM

मुंबई एपीएमसी भाजीपाला घाऊक बाजारात सध्या जवळपास 600 गाड्यांची आवक होत आहे. बाजार आवारात करण्यात आलेल्या खरेदी-विक्रीच्या सर्वेक्षणातून शेतकरी ते ग्राहक दरातील तफावत प्रकर्षाने समोर आली आहे.

APMC Market: मुंबई आणि उपनगरात भाज्यांचे दर गगनाला भिडले, घाऊक बाजार आवारातच भाजीपाल्याच्या दरात तफावत
मुंबई आणि उपनगरात भाज्यांचे दर गगनाला भिडले
Follow us on

नवी मुंबई : मुंबई एपीएमसी घाऊक बाजार आवारात भाजीपाल्याला दोन दर आकारले जात असल्याने ग्राहकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शिवाय बाजार समिती प्रशासन प्रसिद्ध करत असलेले दर आणि मुळात बाजार आवारात असलेले दर यात तफावत असल्याचे समोर आले आहे. भाजीपाला मार्केटमध्ये आज जवळपास 550 गाड्यांची आवक झाली असून घाऊक बाजारात प्रत्येक भाज्यांची दर 15 ते 40 रुपये किलो विक्री केली जात आहे. मात्र याच मार्केटमधील डी पाकळीमध्ये दुप्पट आणि तिप्पट दराने भाजीपाला विक्री केली जात आहे. त्यामुळे मुंबई आणि उपनगरमध्ये ग्राहकांना 100 रुपये किलो दराने भाजीपाला खरीदी करायला लागत आहे.

शेतकऱ्यांना मातीमोल भाव देणारे व्यापारी आणि ग्राहकांना मात्र अधिक पटीने भाजीपाला विकत घ्यावे लागत असल्याचे स्पष्ट झाले आहे. एकीकडे शेतकरी उध्वस्थ होत चालला आहे, तर दुसरीकडे सामान्य ग्राहक महागाईने बेजार झाला आहे. त्यामुळे मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये शेतकरी आणि ग्राहकांमध्ये ही निर्माण झालेली लॉबी कोणाच्या आशीर्वादाने हे काम करते असा सवाल केला जात आहे. तर बाजार समिती प्रशासन यावर गप्प का? तर बाजार समितीवर निवडून आलेले शेतकरी प्रतिनिधी नक्की काय करत आहेत असा सवाल देखील विचारला जात आहे.

नेमकं प्रकरण काय?

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्याला हमीभाव मिळत नाहीय. शेतकऱ्याने पाठवलेल्या शेतमालाची लाखो रुपये थकबाकी वर्षानुवर्षे व्यापारी ठेवत आहेत. पैशांसाठी शेतकरी फक्त हेलपाटे घालताना दिसत आहेत. बाजार समितीला योग्य सेस सुद्धा मिळत नाही.

शेतकरी ते ग्राहक दरातील तफावत

मुंबई एपीएमसी भाजीपाला घाऊक बाजारात सध्या जवळपास 600 गाड्यांची आवक होत आहे. बाजार आवारात करण्यात आलेल्या खरेदी-विक्रीच्या सर्वेक्षणातून शेतकरी ते ग्राहक दरातील तफावत प्रकर्षाने समोर आली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती ही आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. या बाजारसमितीमध्ये घाऊक भाजीपाला मार्केट आहे. घाऊक बाजारात चार पाकळ्या आहेत.

एकाच मार्केटमध्ये दुप्पट दरात भाजीपाला विक्री

या मार्केटमध्ये जवळपास 80 टक्के व्यापाऱ्यांनी व्यापार न करता आपले गाळे भाड्याने दिले आहेत. एका गाळ्यामध्ये 4 ते 5 जण व्यापार करतात. सध्या घाऊक बाजार आवारात दोन विभाग झाले आहेत. डी विंगमध्ये पूर्णपणे किरकोळ दरात भाज्या विकल्या जात आहेत. डी पाकळीमध्ये भाजीपाल्याची 30 ते 70 रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहे. तर इतर पाकळीमध्ये 15 ते 40 रुपये किलो भावाने भाजीपाला विकला जात आहे. अशाप्रकारे सध्या एकाच मार्केटमध्ये दुप्पट दराने भाजीपाला विक्री केला जात आहे. यावर नियंत्रण येणे गरजेचे आहे. त्यासाठी शेतकरी संस्थांचे अध्यक्ष राजाराम टोके यांनी सांगितले की, व्यापारी व्यापाऱ्याच्या हिताचे काम करणार शेतकऱ्यांसाठी नाही. या घाऊक बाजारात दोन दराने विक्री केल्याने मार्केटमधून जाणाऱ्या भाजीपाला उपनगराला चार पट भावाने विक्री केला जातो. त्यामुळे शेतकरी आणि ग्राहकाला मोठा नुकसान होते. यासाठी राज्याचे मुखमंत्री आणि पणन मंत्री लक्ष्य द्यायला पाहिचे नाही तर शेतकरी, ग्राहक कंगाल तर मुंबई एपीएमसी व्यापारी मालामाल होणार.

शेतकरी आणि ग्राहकांचं नुकसान

घाऊक बाजारात कमी दराने मालाची विक्री केली जाते. मात्र, त्याच ठिकाणी किरकोळ मार्केटमध्ये दुप्पट भावाने माल विकला जातो. एकीकडे कमी किंमतीला विकला जाणारा माल तर दुसरीकडे मात्र हाच माल दुप्पट किंमतीच्या भावाने विकला जातो. त्यामुळे APMC मार्केटमध्ये भाजीपाल्याचे एकच मार्केट असून जागेच्या भाड्याच्या किंमतींमुळे व्यापारी भाज्यांचे भाव वाढवत आहेत. त्यामुळे त्याचा परिणाम शेतकऱ्यांवर आणि ग्राहकांवर झालेला दिसून येत आहे.

व्यापाऱ्यांची नेमकी भूमिका काय?

या बाबतीत बाजारात काही व्यापाऱ्यांना विचारपूस केली असता व्यापाऱ्यांनी सांगितले की, बाजार समितीमध्ये संचालकांनी डी पाकळीमधील भाजीपाला किरकोळ भावात विकण्यासाठी सूट दिली आहे. शिवाय या व्यापाऱ्यांकडून बाजार समितीचा सेस भरणा होत नाही. त्यामुळे प्रतिदिन जवळपास सरासरी 600 गाड्यांची आवक होऊन देखील बाजार समितीकडे 20 टक्के सेस जमा होत आहे. त्यामुळे मार्केट संचालकांनी काही व्यापाऱ्यांना घेऊन बाजार समिती संपण्याच्या मागे असल्याचे निदर्शनास येत आहे. यावर पणन मंत्री आणि मार्केट सचिव काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Vegetable prices rose in Mumbai and suburbs, The difference in the price of vegetables in the wholesale market premises)

इतर बातम्या

Muslim Reservation : 5 टक्के मुस्लीम आरक्षणाचा पाठपुरावा करा, नसीम खान यांचं बाळासाहेब थोरातांना पत्र

पर्यटन महामंडळाच्या योजनांच्या माहितीसाठी मंत्रालयात केंद्र, ठिकाणं, पर्यटक निवास, उपहारगृहांसंबंधीची माहिती मिळणार