नवाब मलिक यांचे जावई समीर खान अटक प्रकरण, मुख्य आरोपी सजनानीचा मोठा दावा, म्हणाला…

| Updated on: Nov 01, 2021 | 12:09 AM

मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना ज्या प्रकरणात एनसीबीने अटक केली; त्याच केसमधील मुख्य आरोपी असलेला करण सजनानीने त्याच्या बाबतीत घडलेला प्रकार सांगितलाय. हर्बल तंबाखूला गांजा दाखवून एनसीबीने कारवाई केली आणि आम्हाला चुकीच्या पद्धतीने अटक केली, असा दावा सजनानी यांने केलाय.

नवाब मलिक यांचे जावई समीर खान अटक प्रकरण, मुख्य आरोपी सजनानीचा मोठा दावा, म्हणाला...
KARAN SAJNANI
Follow us on

मुंबई : मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना ज्या प्रकरणात एनसीबीने अटक केली; त्याच केसमधील मुख्य आरोपी असलेला करण सजनानीने त्याच्या बाबतीत घडलेला प्रकार सांगितलाय. हर्बल तंबाखूला गांजा दाखवून एनसीबीने कारवाई केली आणि आम्हाला चुकीच्या पद्धतीने अटक केली, असा दावा सजनानी याने केलाय. तसेच एनसीबीने जप्त केलेल्या तंबाखूचे लॅब रिपोर्ट्स उशिरा आले आणि त्यात तो 200 किलो गांजा नसल्याचं समोर आलं. आम्ही विनाकारण 8 महिने तुरुंगात काढले; असं त्याने टीव्ही 9 शी बोलताना सांगितलंय.

एनसीबीने गांजा समजून ही कारवाई केली

मिळालेल्या माहितीनुसार सजनानी हा ब्रिटिश नागरिक आहे. तो अनेक वर्षांपासून मुंबईत येत-जात असतो. याच दरम्यान त्याची आणि समीर खान यांची ओळख झाली होती. यावेळी तो Saint kush og या नावाने हर्बल तंबाखू विक्रीचा व्यवसाय करत होता. मात्र एनसीबीने गांजा समजून ही कारवाई केली, असं त्याने म्हटलंय. दरम्यान नवाब मलिक यांनीही त्याच्या जावयाला अटक करण्यात आलेल्या केसमध्ये गांजा सापडला नसून तो हर्बल तंबाखू होता असं म्हटलंय.

सुशांत ड्रग्ज केसमध्ये चुकीच्या पद्धतीने अटक

या केसबरोबरच सुशांत ड्रग्ज केसमध्ये मला चुकीच्या पद्धतीने अटक करण्यात आली. मी कधीही सुशांत किंवा रियाला भेटलो नाही. माझा त्यांच्याशी काहीही संबंध नव्हता. तरीही मला त्यात आरोपी बनवण्यात आलं, असा दावा सजनानीने केलाय. मागच्या महिन्यात मी जामिनावर बाहेर आलो. समीर खान यांचीही सुटका झाली. पण आमच्या बाबतीत चुकीचं घडलं असंदेखील सजनानी म्हणाला.

काय आहे प्रकरण?

समीर खान हे नवाब मलिक यांची कन्या निलोफर यांचे पती आहेत. समीर खान यांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) समन्स बजावले होते. ड्रग्ज प्रकरणातील संशयित करण सजनानी यांच्यासोबत समीर खान यांचा गुगल पे द्वारे 20 हजार रुपयांचा व्यवहार झाला होता. सजनानी याने ड्रग्ज पुरवल्यामुळे समीर यांनी त्यांना 20 हजार रुपये गुगल पे द्वारे पैसे पाठवल्याचा आरोप आहे. मुच्छड पानवाला ड्रग्ज प्रकरणाची चौकशी सुरु असताना हा व्यवहार समोर आला. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एनसीबीने समीर यांना बोलावलं होतं. या प्रकरणी त्यांची चौकशी झाली. त्यानंतर 14 जानेवारी रोजी समीर खान यांना एनसीबीने अटक केली होती.

फर्निचरवाला यांच्याकडून 200 किलो ड्रग्ज जप्त

एनसीबीने ब्रिटीश नागरिक करण सजनानी आणि राहिला फर्निचरवाला यांच्याकडून 200 किलोचे ड्रग्ज जप्त केले होते. याप्रकरणी केम्प कॉर्नर येथील प्रसिद्ध मुच्छड पानावाला यालाही अटक करण्यात आली होती. त्याला न्यायदंडाधिकाऱ्यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्याशिवाय मुच्छड पानवाला दुकानाचे मालक रामकुमार तिवारी यालाही एनसीबीने ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी अटक केली होती. गांजा, ड्रग्ज विकताना तिवारी पकडला गेला होता. त्यामुळे त्यालाही तुरुंगात टाकण्यात आलं होतं.

इतर बातम्या :

महाविकास आघाडीमध्ये दूध साखरेसारखी ‌गोडी, आदित्य ठाकरेंची बाळासाहेब थोरातांसमोर चौफेर फटकेबाजी

Video | विषय गंभीर आठवले खंबीर ! क्रांती रेडकरांच्या पत्रकार परिषदेत कवितांमुळे पिकला हशा

“शिवसेनेला लक्ष्य न करता भुंकणे बंद करा,” शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचा नारायण राणेंना सल्ला