“शिवसेनेला लक्ष्य न करता भुंकणे बंद करा,” शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचा नारायण राणेंना सल्ला

केंद्रीय सूक्ष्म व लघु उद्योगमंत्री नारायण राणे यांनी राज्यात उद्योगधंदे याकडे लक्ष द्यावे. नसते उद्योग करू नये. शिवसेनेला लक्ष्य न करता भुंकणे बंद करावे, ते फक्त शिवसेनेवर भूंकण्यासाठी आहेत, अशी टीका बुलढाणा शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी पत्रपरिषदेत केली.

शिवसेनेला लक्ष्य न करता भुंकणे बंद करा, शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचा नारायण राणेंना सल्ला
SANJAY GAIKWAD NARAYAN RANE
Follow us
| Updated on: Oct 31, 2021 | 11:35 PM

बुलडाणा : केंद्रीय सूक्ष्म व लघु उद्योगमंत्री नारायण राणे यांनी राज्यात उद्योगधंदे याकडे लक्ष द्यावे. नसते उद्योग करू नये. शिवसेनेला लक्ष्य न करता भुंकणे बंद करावे, ते फक्त शिवसेनेवर भूंकण्यासाठी आहेत, अशी टीका शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी पत्रपरिषदेत केली. ते बुलडाण्यात बोलत होते.

शिवसेनेला लक्ष्य न करता भुंकणे बंद करावे

केंद्रीय मंत्री नारायण राणे सतत आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. शिवसेना आणि नारायण राणे यांच्यातील वाद काही नवीन नाही. काही दिवसांपूर्वी राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना आमदार संजय गायकवाड यांनी राणे यांना घरात घुसून मारण्याचे वादग्रस्त विधान केले होते. आज नारायण राणे बुलडाणा जिल्ह्यातील चिखली शहरात एका कार्यक्रमानिमित्त आले होते. तर बुलडाणा येथील जनसंपर्क कार्यालयात आज आयोजित पत्रकार परिषदेत आमदार गायकवाड यांना पत्रकारांनी नारायण राणे यांच्या संदर्भात विचारणा केली. यावेळी राणे यांनी राज्यात उद्योगधंदे याकडे लक्ष द्यावे. शिवसेनेला लक्ष्य न करता भुंकणे बंद करावे, असा सल्ला आमदार संजय गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिला.

राणे म्हणाले आमदार गायकवाड कोण आहेत ?

त्याला उत्तर म्हणून आमदार संजय गायकवाड यांच्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पलटवार केलाय. “आमदार गायकवाड कोण आहेत ? त्याचा अधिवेशनात काधी आवाज ऐकला नाही. कुठे भुंकायचे काय करायचे हे त्यांना माहिती आहे. त्यामुळे ते विधानसभेत बोलत नाहीत. पण बाहेर भुंकायचे काम करतात. त्यामुळे त्यांनी कुत्रा सोडून कोणाची संगत केली नाही. त्यांना दुसरे उत्तर देता येत नाही. मला सध्या शिवसेनेला धुवायचे काम आहे, असे नारायण राणे म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांच्यावर गायकवाड यांची टीका

दरम्यान, राणे आणि गायकवाड यांच्यातील शाब्दिक युद्धाची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. यापूर्वीदेखील गायकवाड यांनी भाजप नेत्यांना लक्ष्य केलेलं आहे. त्यांनी थेट विरोधी पक्षनेते देवेंद्र पडणवीस यांच्यावर टीका करताना 19 एप्रिल रोजी वादग्रस्त विधान केलं होतं. “मला जर कोरोनाचे जंतू सापडले असते, तर मी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबून टाकले असते,” असं गायकवाड म्हणाले होते. त्याला उत्तर देताना गायकवाड यांची उतरली नसल्याने त्यांनी अश्लील भाषेत टीका केलीय, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.

इतर बातम्या :

ठाकरे सरकारला शेतकऱ्यांऐवजी नबाब मालिकांचा जावई, शाहरुखचं पोरगं कसं सुटेल यामध्ये स्वारस्य, विनायक मेटेंचा आरोप

सर, बेइज्जती केली जातेय, घाबरवण्याचा प्रयत्न होतोय, समीर वानखेडे भडकले, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या उपाध्यक्षांकडे तक्रार

Special story | देशात हलकल्लोळ, 29 गोळ्या झाडून इंदिरा गांधी यांची हत्या, त्याच दिवशी पंतप्रधानपदाचा पेच कसा सुटला?, वाचा इन्साईड स्टोरी

(shiv sena mla sanjay gaikwad criticizes bjp leader narayan rane)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.