सर, बेइज्जती केली जातेय, घाबरवण्याचा प्रयत्न होतोय, समीर वानखेडे भडकले, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या उपाध्यक्षांकडे तक्रार

सर, आमच्या कुटुंबाची बेइज्जती केली जात आहे. आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न होत आहे. माझ्यावर दबाव आणला जात आहे. त्यामुळे आम्हाला न्याय द्या. (NCSC Vice-Chairman arun halder met sameer wankhede)

सर, बेइज्जती केली जातेय, घाबरवण्याचा प्रयत्न होतोय, समीर वानखेडे भडकले, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या उपाध्यक्षांकडे तक्रार
sameer wankhede
Follow us
| Updated on: Oct 31, 2021 | 6:35 PM

मुंबई: सर, आमच्या कुटुंबाची बेइज्जती केली जात आहे. आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न होत आहे. माझ्यावर दबाव आणला जात आहे. त्यामुळे आम्हाला न्याय द्या, अशी मागणी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी केली. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष अरुण हलदर हे वानखेडे यांच्या घरी आले होते. यावेळी वानखेडे रोज होणाऱ्या आरोपांनी अत्यंत भडकलेले होते. वैतागलेले होते. त्यांच्या बोलण्यातून ते स्पष्टपणे जाणवत होते.

संपूर्ण खानदान बोगस आहे, अशी भाषा मीडिया समोर करणं योग्य नाही. सर मी दलित समाजातून येतो. हे लोक माझी बेइज्जती करण्याचं काम करत आहेत. बोगसचा अर्थ काय होतो सर…? मला बेइज्जत केलं जात आहे. माझा युनिफॉर्म काढून घेणार, माझी नोकरी हिरावून घेणार… असं धमकावलं जात आहे. सर मला राष्ट्रपती नियुक्त करतात. जर मी काही चुकीचं काही केलं असेल तर राष्ट्रपती त्यावर न्याय करतील आणि तुम्ही न्याय कराल. रोज सकाळी 8 वाजता आणि 10 वाजता पत्रकार परिषद घेतली जात आहे. माझ्या कुटुंबाबत बोललं जात आहे. प्रायव्हेट गोष्टी सांगितल्या जात आहेत. आम्हाला टार्गेट केलं जात आहे. या गोष्टी बंद होत नाहीत. रोज मीडियाला बोलावून टीका केली जात आहे. मला घाबरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. माझ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. माझं तुम्हाला निवेदन आहे की कायद्याच्या चौकटीत राहून जे काही असेल त्याचं निवारण करा, अशी विनंतीच वानखेडे यांनी केली.

कागदपत्रे दाखवली

वानखेडे अत्यंत अवेशाने बोलत होते. पोटतिडकीने आपलं म्हणणं मांडत होते. यावेळी त्यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी हलदर यांना जातीशी संबंधित सर्व कागदपत्रे हलदर यांना दाखवली. ज्ञानदेव वानखेडे यांनीही त्यांची फॅमिली बॅकग्राऊंड हलदर यांना सांगितली.

तीन लोकांकडून घराची रेकी

दरम्यान, समीर वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडकर हिने आज केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची भेट घेतली. त्यानंतर क्रांती रेडकरने मीडियाशी बोलताना मोठा गौप्यस्फोट केला. तीन लोकं आमच्या घराची पाळत ठेवत आहेत. त्यांनी आमच्या घराची रेकी केली आहे. आम्हाला सोसायटीकडून कळलं. ते लोक आमच्या घराची विचारपूस करत होते. त्यांनी नंबरही दिले. पोलीस असल्याचं सांगत होते. आम्ही पोलिसांना फोन केला. तुमच्याकडून कोणी आलं होतं का विचारलं. पण ते नाही म्हणाले. म्हणून आम्ही ट्रु कॉलरवर चेक केले. ते भलत्याच माणसांचे होते. आम्ही सीसीटीव्ही फुटेज आणि नंबर पोलिसांना दिले आहेत. लवकरच कळेल ती लोकं कोण होती? असा क्रांतीने सांगितलं.

संबंधित बातम्या:

घरातील तिघांनी आधी उंदिर मारायचं औषध घेतलं, नंतर पोलिसांना फोन, पण जे नको घडायला होतं ते घडलंच

अरे, बाबा तुम्हाला कोणी अडवले? या धमक्या द्यायचं बंद करा, जे करायचं ते करा; चंद्रकांत पाटलांचं मलिक यांना आव्हान

VIDEO: दाऊदला विमानात कोणी बसवलं होतं? त्याच्यासोबत कोण होतं?; किरीट सोमय्यांचा थेट सवाल

(NCSC Vice-Chairman arun halder met sameer wankhede)

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.