AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सूरज चव्हाण प्रकरणी अजित पवारांची मोठी कारवाई, घेतला मोठा निर्णय

लातूर येथील सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेत झालेल्या हिंसक घटनेनंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. अजित पवार यांनी त्यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले आहेत. ही कारवाई पक्षाच्या शिस्तीचे उल्लंघन करणाऱ्या वर्तनावर झाली आहे.

सूरज चव्हाण प्रकरणी अजित पवारांची मोठी कारवाई, घेतला मोठा निर्णय
| Updated on: Jul 21, 2025 | 1:49 PM
Share

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या लातूर दौऱ्यादरम्यान राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. सुनील तटकरे यांची लातूरमध्ये पत्रकार परिषद सुरु असताना कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात निवेदन द्यायला आलेल्या काही कार्यकर्त्यांनी सुनील तटकरे यांच्यासमोर पत्ते फेकले. त्यानंतर संतापलेल्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली. या मारहाण प्रकरणात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांचा सहभाग असल्याचे समोर आले होते. त्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली जात होती. आता अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अजित पवार यांनी सूरज चव्हाण यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे.

अजित पवारांच्या ट्वीटमध्ये काय?

लातूरमध्ये सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेत झालेल्या राड्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांच्यावर अखेर कारवाई करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अजित पवार यांनी सूरज चव्हाण यांना त्यांच्या पदाचा राजीनामा देण्याच्या सूचना दिल्या आहेत. अजित पवार यांनी सोमवारी यासंदर्भात एक ट्विट करत कारवाईची माहिती दिली आहे.

“काल लातूरमध्ये घडलेल्या अत्यंत गंभीर आणि निषेधार्ह घटनेच्या पार्श्वभूमीवर, मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांना त्यांच्या पदाचा त्वरित राजीनामा द्यायच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. पक्षाच्या मूल्यांच्या विरोधात जाऊन केले जाणारे वर्तन कोणत्याही स्थितीत स्वीकारले जाणार नाही, यासाठी हा कठोर निर्णय घेतला आहे.” असे अजित पवारांनी ट्वीटमध्ये नमूद केले आहे.

सुनील तटकरेंकडून जाहीर नाराजी

लातूर येथील सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेत कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात निवेदन द्यायला आलेल्या छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तटकरे यांच्यासमोर पत्ते फेकले. या घटनेनंतर संतप्त राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली होती. या घटनेचे तीव्र पडसाद राजकीय वर्तुळात उमटले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही सूरज चव्हाण यांच्या कृत्याबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली होती. यानंतर अजित पवार यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घालत मोठी कारवाई केली आहे.

सूरज चव्हाण कोण?

दरम्यान सूरज चव्हाण हे अजित पवार यांच्या निकटवर्तीयांपैकी एक मानले जात होते.  अजित पवारांनी शरद पवारांपासून वेगळा गट स्थापन केल्यानंतर सुरुवातीच्या टप्प्यात त्यांच्यासोबत आलेल्या नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होता. त्यांच्यावर ही कारवाई झाल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. या निर्णयानंतर आता सूरज चव्हाण लवकरच आपल्या पदाचा राजीनामा देतील असे सांगितले जात आहे.

Follow Us
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला
Nitin Nabin | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला, राजकीय कारण काय?
जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती
ChandrakantPatil | जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती; पुढे म्हणाले...
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी फडणवीस-नबीन; सिद्धिविनायक मंदिरात...
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी CM फडणवीस- नितीन नबीन; सिद्धिविनायक मंदिरात घेतले बप्पांचे दर्शन!
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक