Jitendra Awhad : ‘जितेंद्र माझ्यावर विश्वास ठेव..’ अजित पवारांसोबतच्या शेवटच्या संभाषणावर जितेंद्र आव्हाडांचा मोठा खुलासा

Jitendra Awhad : "माझा बाप जो निर्णय घेईल तो निर्णय आम्ही घेऊ. आपलं ठरलेलं आहे, बाप जो निर्णय घेईल तो मान्य आहे" असं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं.

Jitendra Awhad : जितेंद्र माझ्यावर विश्वास ठेव.. अजित पवारांसोबतच्या शेवटच्या संभाषणावर जितेंद्र आव्हाडांचा मोठा खुलासा
Jitendra Awhad
| Updated on: Feb 02, 2026 | 4:47 PM

“मीच बिनविरोध महापौर दिला होता. दिवस येतात दिवस जातात. सर्व गोष्टी काय आम्ही विसरत नाही. भाजप विरोधी बाकावर बसणार नाही ते सत्तेत बसणार. उप महापौरपद त्यांना देणार. सत्तेत सहभागी होणार” असा दावा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जितेंद्र आव्हाड यांनी केला. “स्वतंत्र धरण पुढील दहा वर्षाच्या आत निर्माण झाले पाहिजे. 2002 साली निर्णय घेतला असता तर स्वतंत्र धरण झालं असतं” असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. “अधिकारी स्वतःच्या सोयीनुसार पैसे घेत आहेत. हे मी प्रामाणिकपणे सांगत आहे. आयुक्ताने याबाबत लक्ष द्यावे. तक्रार करून देखील काहीही होत नाही. काहीही शरम नाही अधिकाऱ्यांना” अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली.

“विलनीकरणाचा पुढाकार तर अजित पवारांनी घेतला होता. त्यांचं आणि माझं शेवटचं संभाषण झालं. हे मी आतापर्यंत बोललो नाही तुम्हाला. सांगतो या विषयावरती फार मला बोलायचं नाही. अजित दादा मला म्हणाले, जितेंद्र माझ्यावर विश्वास ठेव सगळं व्यवस्थित होईल. मला या चर्चेतून मुद्दामून लांब राहायचं आहे. त्यांना काय चर्चा करायची ते करू द्या” असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

चर्चा करणे नैतिकता कशालाच धरून नाही

“घाणेरड्या, थर्ड ग्रेड कॉन्ट्रोव्हर्सी मध्ये मला जायचं नाही. तो माणूस गेला आता त्यावर तो माणूस बोलला होता का? काय बोलला होता? चर्चा करणे नैतिकता कशालाच धरून नाही. तो माणूस गेला आता. आपण त्याच्यावरती काय बोलू शकतो. मी काहीच खुलासा करणार नाही. तुम्ही स्पेसिफिकली विचारलं म्हणून मी तुम्हाला उत्तर दिलं. मी गेले काही महिने चूप बसून आहे. त्याची काही कारण आहेत. शांत बसलेले बरं, आहे जे होईल ते होईल” असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. “माझा बाप जो निर्णय घेईल तो निर्णय आम्ही घेऊ. आपलं ठरलेलं आहे, बाप जो निर्णय घेईल तो मान्य आहे” असं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं.