AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NCP : अजितदादांच्या निधनानंतर आता राष्ट्रवादीचा मोठा निर्णय, राजकारणात घडामोडींना वेग

अजित पवार यांच्या विमानाला बुधवारी भीषण अपघात झाला, या अपघातामध्ये अजित पवार यांचं निधन झालं, अजित पवार यांच्या निधनामुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली, आता या सर्व पार्श्वभूमीवर मोठी बातमी समोर आली आहे.

NCP : अजितदादांच्या निधनानंतर आता राष्ट्रवादीचा मोठा निर्णय, राजकारणात घडामोडींना वेग
ncp Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 02, 2026 | 3:38 PM
Share

अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला, या अपघातामध्ये अजित पवार यांचं निधन झाल्याची दुर्दैवी घटना घडली. अजित पवार यांच्या निधनानंतर आता राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे, सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे, तसेच अर्थमंत्रिपद वगळता इतर तीन खात्यांची जबाबदारी देखील त्यांना देण्यात आली आहे. तसेच राष्ट्रवादीच्या विधिमंडळ गटनेतेपदी देखील त्यांची निवड करण्यात आली आहे. पक्षासंदर्भात सर्व निर्णय घेण्याचे अधिकार देखील त्यांना प्राप्त झाले आहेत. उपमुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीपूर्वी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांच्या बैठकीत यासदंर्भात एकमतानं निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी राज्यात महापालिकांच्या निवडणुका झाल्या होत्या, या निवडणुकीत भाजपला मोठं यश मिळालं होतं. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये देखील भाजपचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले. या  दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटानं एकत्र येत भाजपला थेट आव्हान दिलं, मात्र या निवडणुकीत राष्ट्रवादीला म्हणावं तेवढ यश मिळू शकलं नाही, दरम्यान त्यानंतर आता अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षानं मोठा निर्णय घेतला आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापौर निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीकडून महापौर पदासाठी उमेदवार दिला जाणार नाहीये, अजित पवारांच्या निधनानंतर  पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापौरपदासाठी उमेदवार न देण्याचा निर्णय पक्षानं घेतला आहे. राष्ट्रवादी पक्षाकडून ही निवडणूक लढवली जाणार नाहीये. राष्ट्रवादीचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नसल्यानं आता या ठिकाणी भाजपचा उमेदवार बिनविरोध निवडून येण्याची शक्यता आहे. आज दुपारी 3 ते 5 च्या दरम्यान महापौर पदासाठी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे, त्यामुळे पिंपरी चिंचवडमध्ये आता भाजपचा महापौर होणार हे जवळपास निश्चित झालं आहे.

महापालिकेत भाजपला मोठ यश 

महापालिका निवडणुकांमध्ये यावेळी भाजपला मोठं यश मिळालं आहे, अनेक ठिकाणी भाजपनं या निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटासोबत युती केली होती, तरा राष्ट्रवादी अजित पवार गटानं मात्र या निवडणुकीत काही ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गटासोबत युती केली तर काही ठिकाणी निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला.

Follow Us
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू-बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले, आम्ही बदनाम...
शेतकऱ्यांची पिकं दुष्काळामुळे करपली अन् आढावा बैठकीत नेत्यांचा बदामावर
शेतकऱ्यांची पिकं दुष्काळामुळे करपली अन् आढावा बैठकीत नेत्यांचा काजु-बदामावर ताव
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तप
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला वरंवार पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तपासणी
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांचां दावा
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांच्या मोठ्या दाव्याने खळबळ
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्री...
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्र्यांना तातडीचे आदेश
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान...
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान थेट वकीलांसह 'मातोश्री'ला जाणार
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, बंगाल...
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, नेमकं प्रकरण काय?
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठवताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट.... बंगालमध्ये राजकीय हालाचाली वाढल्या?
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल