Rohit Pawar News: रोहित पवारांचा सरकारविरोधात एल्गार! सर्वात मोठी घोषणा; शेतकऱ्यांचा मोर्चा अधिवेशनात धडकणार

राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी कोणतीही घोषणा झाली नाही, असे म्हणत त्यांनी 4 डिसेंबर पासून 9 डिसेंबर पर्यंत शेतकऱ्यांसाठी मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली आहे.

Rohit Pawar News: रोहित पवारांचा सरकारविरोधात एल्गार! सर्वात मोठी घोषणा; शेतकऱ्यांचा मोर्चा अधिवेशनात धडकणार
| Updated on: Nov 22, 2026 | 7:22 PM

MLA Rohit Pawar:  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राज्यातील दुष्काळावरुन राज्य सरकारला सवाल करत सर्वात मोठी घोषणा केली आहे. राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी कोणतीही घोषणा झाली नाही, असे म्हणत त्यांनी 4 डिसेंबर पासून 9 डिसेंबर पर्यंत शेतकऱ्यांसाठी मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली आहे. शेगावपासून नागपूरपर्यंत हा मोर्चा निघणार असून तो थेट विधानसभा अधिवेशनात धडकणार असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले आहे.

काय म्हणाले रोहित पवार?

Loading...

आज विदर्भातल्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आणि महत्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीत बैठक झाली.  शेतकरी शेतमजुरांना येणाऱ्या अडचणींवर चर्चा झाली आम्ही पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शेतकऱ्यांना भेटलो त्यांच्या अडचणी समजुन घेतल्या. त्या समजून घेतल्यानंतर आदरणीय शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले. मात्र आमच्या मागण्यांवर  सरकारकडुन शेतकऱ्यांसाठी कोणतीही घोषणा झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागण्यांना आवाज म्हणून आम्ही  4 डिसेंबर ते 9 डिसेंबरपर्यंत न्यायहक्क ट्रॅक्टर मोर्चा काढणार आहे. शेगाव ते नागपूर असा हा मोर्चा सुरु होणार असून अधिवेशनापर्यंत तो धडकणार आहे, असं रोहित पवार म्हणालेत.

काय आहेत रोहित पवार यांच्या मागण्या?

शेतकऱ्याला हेक्टरी एक लाख, भूमीहिन शेतमजुरांना 25 हजारांची मदत यावी.  फळबागा आहेत त्यांना प्रति हेक्टर दिड लाखांची मदत व्हावी, फळबागा जगवण्यासाठी 60 हजारांची मदत पाहिजे आणि अधिवेशन सुरु होण्याआधी ही मदत पोहोचावी, 1 रुपयात पिकविमा योजना सुरु करावी, मायक्रो फायनांसची वसुली थांबवावी, चारा छावण्या सुरु कराव्या अशा मोठ्या मागण्या रोहित पवार यांनी केल्या आहेत.

“बळीराजा दुष्काळाच्या वणव्यात होरपळतोय आणि सरकार सत्तेच्या नशेत धुंद आहे..! यंदा दुष्काळामुळं खरीप जळून खाक झाला आणि रब्बीची पेरणीही केवळ १७ टक्के (१५-१६ लाख हेक्टर) इतकी निच्चांकी झाली. १९७२ च्या महाभयंकर दुष्काळातही ४७ लाख हेक्टरवर पेरणी झाली होती; यावरुन यंदाचा दुष्काळ किती भयावह आहे, याची कल्पना येते! असं असतानाही सत्ताधारी मात्र केवळ मदतीच्या कोरड्या घोषणा देण्यात दंग आहेत, असा टोलाही रोहित पवार यांनी लगावला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us