Rohit Pawar: ‘शेतकऱ्यांची थट्टा, महाजनांना लाज वाटली पाहिजे’, रोहित पवार संतापले!

ज्या शेतकऱ्यांना पैशाची गरज नसेल त्या शेतकऱ्यांनी पैसे परत करावेत असं ते म्हणालेत. महाजन यांच्या या विधानावरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे.

Rohit Pawar: शेतकऱ्यांची थट्टा, महाजनांना लाज वाटली पाहिजे, रोहित पवार संतापले!
Rohit Pawar On Girish Mahajan
| Updated on: Nov 08, 2026 | 3:45 PM

MLA Rohit Pawar On Girish Mahajan:  राज्यातील शेतकरी सध्या भीषण दुष्काळाच्या संकटात आहे. एकीकडे बळीराजा संकटात असल्याने राज्य सरकारने दिवाळीसाठी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ५००० रुपयांची रक्कम जमा केली आहे. आता याच रकमेवरुन भारतीय जनता पक्षाचे नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांनी मोठं विधान केले आहे. ज्या शेतकऱ्यांना पैशाची गरज नसेल त्या शेतकऱ्यांनी पैसे परत करावेत असं ते म्हणालेत. महाजन यांच्या या विधानावरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे.

काय म्हणाले रोहित पवार?

Loading...

“गिरीश महाजन साहेबांना मला सांगायचं आहे तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. एकतर पाच हजार रुपये देऊन तुम्ही शेतकऱ्यांची
थट्टा केली आहे. शेतमजूरांना तुम्ही काहीच मदत केली नाही. पवित्रभूमी नाशिकमध्ये जिथे महाकुंभ होतोय, तिथे तुम्ही हजारो
कोटींचा भ्रष्टाचार करत आहात. गरिबांच्या बाबतीत मात्र तुम्ही दिलेले पैसे परत मागत आहात. खरतंर या सरकारमध्ये असलेल्या
प्रत्येकाला लाज वाटली पाहिजे, यांना काही कळत नाही. हे नेते आहेत त्यांचा मानच काय? हे समजत नाही. यांना योग्यवेळी जागा दाखवली पाहिजे,” अशा शब्दात रोहित पवार यांनी गिरीश महाजन यांच्यावर सडकून टिका केली आहे.

काय म्हणाले होते मंत्री गिरीश महाजन? 

“पाच पाच हजार रुपयांची मदत सरकारने सर्व शेतकऱ्यांना दिले आहेत. मात्र अनेक शेतकरी असे आहेत माझ्याकडे सकाळपासून 50 शेतकरी आलेत, त्यांनी सांगितलं की आम्हाला पाच हजार रुपये आहेत पण ते मला परत करायचे आहेत. कारण मला आवश्यकता नाही. माझा जोडधंदा आहे, माझ्याकडे तशी पैशाची चणचण नाही. त्यामुळे माझे आवाहन आहे की, ज्यांना गरज नाही अशा आर्थिकदृष्ट्या सक्षम शेतकऱ्यांनी पाच हजार रुपये परत करावेत, असं आवाहन मंत्री गिरीश महाजन यांनी केले होते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us