ना राज्यपालांवर बोलले, ना सोमय्यांवर, पवार थेट ललित मोदींवर बोलले! नेमके काय म्हणाले? वाचा सविस्तर

| Updated on: Sep 21, 2021 | 9:01 PM

राज्यात सध्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात पुन्हा एकदा पत्रसंघर्ष सुरु झालाय. त्याचबरोबर किरीट सोमय्या यांचीही महाविकास आघाडीतील नेत्यांवर आरोपांची मालिका सुरु आहे. याबाबत आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी शरद पवारांनी राजकारणावर न बोलता क्रिकेट आणि ललित मोदीवर भाष्य केलं!

ना राज्यपालांवर बोलले, ना सोमय्यांवर, पवार थेट ललित मोदींवर बोलले! नेमके काय म्हणाले? वाचा सविस्तर
शरद पवार, ललित मोदी
Follow us on

पुणे : राज्यात सध्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात पुन्हा एकदा पत्रसंघर्ष सुरु झालाय. त्याचबरोबर किरीट सोमय्या यांचीही महाविकास आघाडीतील नेत्यांवर आरोपांची मालिका सुरु आहे. याबाबत आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी शरद पवारांनी राजकारणावर न बोलता क्रिकेट आणि ललित मोदीवर भाष्य केलं! भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू चंदू बोर्डे यांचा सन्मान केला. त्यावेळी शरद पवार पत्राकारांशी बोलत होते. (NCP President Sharad Pawar praises Lalit Modi)

पवारांकडून ललित मोदींचं कौतुक का?

पुण्यातील कार्यक्रमात बोलताना पवारांनी ललित मोदींचं कौतुक केलं होतं. त्याबाबत विचारलं असता, ‘ललित मोदी यांनी खेळात जे योगदान दिलं त्याबाबत मी बोललो. मी बाकी काही बोललो नाही. त्याचा काही माझा विषय नव्हता इथे. पण ही गोष्ट खरी आहे की आज जगात आयपीएलचं नाव झालं आहे. महाराष्ट्राचा आपला एकच गेम असा आहे जो महाराष्ट्रातून जगात गेलाय आणि जगातील खेळाडू महाराष्ट्रात येत आहेत. त्या आयपीएलच्या निर्मितीमध्ये मी अध्यक्ष असताना जो निर्णय घेतला त्याच्या उभारणीमध्ये ललित मोदी यांचं योगदान होतं ही वस्तुस्थिती आहे’, असं पवार म्हणाले.

चंदू बोर्डे यांचा सन्मान

‘क्रिकेटच्या क्षेत्रात ज्यांची अतिशय चांगली कामगिरी केली. खुपदा जोपर्यंत त्यांना प्रसिद्धी मिळत असते तोपर्यंत लोकांच्या तोंडावर त्यांचं नाव असतं. मात्र, त्याचं करिअर संपल्यानंतर त्या खेळाडूकडे दुर्दैवानं पाहिलं जात नाही. पण मला अतिशय आनंद आहे की पुणेकरांनी चंदू बोर्डे यांचं क्रिकेटमध्ये जे योगदान आहे त्यांची नोंद घेऊन, त्याची आठवण ठेवून आज त्यांचा सन्मान केला. याच पद्धतीचा दृष्टीकोन ज्यांनी कुठल्याही खेळात योगदान दिलं त्याच्याबद्दल दाखवला तर नवीन खेळाडू तयार होण्यास मदत होईल. भारताचं नावलौकिक या क्षेत्रात वाढेल याची मला पूर्ण खात्री आहे’, असं मत पवारांनी व्यक्त केलं आहे.

‘पवारांचं मुंबईशी असलेलं अजोड नातं’

क्रिकेटच्या क्षेत्रात मी जे वर्ल्ड क्रिकेटचा अध्यक्ष झालो त्याचं कारण मुंबई आहे. मुंबई, मुंबईवरुन बीसीसीआय, बीसीसीआयवरुन एशियन क्रिकेट आणि तिथून आयसीसी. माझी सुरुवात तिथून झाली असल्या कारणामुळे माझी आस्था ही मुंबईसाठी कायम असेल, असंही पवार म्हणाले. पत्रकारांनी राजकारणाबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना मी खेळाच्या कुठल्याही कार्यक्रमात जातो तेव्हा मुख्यमंत्री, राज्यपाल आणि राजकारणाबाबत कुठलीही चर्चा करत नाही, असं पवारांनी सांगितलं.

ललित मोदींवर नेमके आरोप काय?

आयपीएल यशस्वी करणाऱ्या ललित मोदींनी आयपीएलचा कारभार मनमानीपणे केल्याचा आरोप त्यांच्यावर आहेत. फ्रँचायजींना आपल्या मनाप्रमाणे वागण्यास धमकावलं. त्यांनी बीसीसीआयचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान करणारे निर्णय घेतले, असं अनेक आरोप त्यांच्यावर ठेवले गेलेले होते. या सगळ्या आरोपांमध्ये ते दोषी असल्याचंही सिद्ध झालं. विशेष समितीनं सादर केलेल्या 133 पानांच्या अहवालात हा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर ललित मोदी यांच्यावर बीसीसीआयनं आजीवन बंदी घातली. त्यामुळे त्यांना भारतीय क्रिकेटमध्ये कुठल्याही प्रकारचं पद भूषवता येणार नाही. त्यामुळेच आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप असलेले मोदी भारतीय क्रिकेटविश्वाबाहेर फेकले गेले आहेत.

इतर बातम्या :

निलंबित आमदारांबाबत भाजपला मोठा दिलासा, निवडणूक आयोगाचा निर्णय काय?

‘राज्यपालांनी विरोधकांचं थोबाड फोडलं पाहिजे, पण ते उत्तेजन देतात’, संजय राऊतांचा घणाघात

NCP President Sharad Pawar praises Lalit Modi