AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निलंबित आमदारांबाबत भाजपला मोठा दिलासा, निवडणूक आयोगाचा निर्णय काय?

12 निलंबित आमदारांबाबत भाजपला मोठा दिलासा मिळाला आहे. या निलंबित आमदारांना राज्यसभा निवडणुकीत मतदान करता येणार आहे. निवडणूक आयोगाकडून भाजपच्या या 12 आमदारांना दिलासा देण्यात आलाय. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशात गैरवर्तनाचं कारण देत भाजपच्या 12 आमदारांचं एक वर्षासाठी निलंबन करण्यात आलं होतं.

निलंबित आमदारांबाबत भाजपला मोठा दिलासा, निवडणूक आयोगाचा निर्णय काय?
भाजपचे 12 निलंबित आमदार (फाईल फोटो)
| Edited By: | Updated on: Sep 21, 2021 | 7:41 PM
Share

मुंबई : महाराष्ट्रातील 12 निलंबित आमदारांबाबत भाजपला मोठा दिलासा मिळाला आहे. या निलंबित आमदारांना राज्यसभा निवडणुकीत मतदान करता येणार आहे. निवडणूक आयोगाकडून भाजपच्या या 12 आमदारांना दिलासा देण्यात आलाय. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशात गैरवर्तनाचं कारण देत भाजपच्या 12 आमदारांचं एक वर्षासाठी निलंबन करण्यात आलं होतं. त्यानंतर आता राज्यसभा निवडणुकीत या आमदारांना मतदान करण्याची परवानगी असणार आहे. त्यामुळे भाजपला हा मोठा दिलासा मानला जात आहे. (BJP’s 12 suspended MLAs will be able to vote in Rajya Sabha elections)

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभा अध्यक्षांच्या दालनात जोरदार राडा पाहायला मिळाला होता. सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजपच्या आमदारांमध्ये धक्काबुक्की झाली होती. त्याचबरोबर तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनाही धक्काबुक्की आणि शिवीगाळ झाल्याचा आरोप करण्यात आला होता. या घटनेनंतर भास्कर जाधव यांनी आपलं मत सभागृहात मांडलं. त्यानंतर संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी भाजप आमदारांच्या निलंबनाचा ठराव मांडला आणि हा ठराव आवाजी बहुमतानं मंजूर करण्यात आला होता. त्यानुसार भाजपच्या 12 आमदारांचं एक वर्षासाठी निलंबन करण्यात आलं.

भाजपच्या कोणत्या आमदारांचं निलंबन?

ओबीसी आरक्षणावरील ठरावावर चर्चा सुरू असताना राजदंड उचलणे, माईक ओढणे आणि सभागृह अध्यक्षांना शिवीगाळ केल्याप्रकरणी एकूण 12 सदस्यांचं निलंबन करण्यात आलं. त्यात आशिष शेलार, योगेश सागर, अभिमन्यू पवार, संजय कुटे, अतुल भातखळकर, पराग अळवणी, गिरीश महाजन, राम सातपुते, हरीश पिंपळे, नारायण कुचे, जयकुमार रावत किर्तीकुमार बागडीया आदी आमदारांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आलं आहे. या वर्षभरात त्यांना मुंबई आणि नागपूर येथील अधिवेशनात सामिल होण्यास मज्जाव करण्यात आला आहे. संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी ही माहिती आज विधानसभेत दिली.

सभागृहात नेमकं काय घडलं होतं?

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत ओबीसींचा इम्पिरीकल डेटा केंद्र सरकारकडून मिळावा म्हणून अधिवेशनात ठराव मांडला. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपची भूमिका मांडली. त्यानंतर भुजबळांनी बोलण्यास सुरुवात केली. यावेळी उज्ज्वला गॅससाठी डेटा वापरला जातो. मग ओबीसींच्या आरक्षणासाठी का दिला जात नाही? असा सवाल भुजबळ यांनी केला. त्यावर फडणवीसांनी हरकतीचा मुद्दा मांडला. त्यावेळी तालिका अध्यक्षांनी फडणवीसांचा हरकतीचा मुद्दा स्वीकारला नाही. अध्यक्षांनी भुजबळांना बोलण्यास सांगितलं. त्यामुळे भाजपचे आमदार आक्रमक झाले होते.

भाजपच्या आक्रमक आमदारांनी अध्यक्षांच्या समोरी हौदात येऊन जोरदार घोषणाबाजी करत गोंधळ घातला. त्यानंतर एका आमदाराने अध्यक्षांचा माईक ओढला. या गदारोळात धक्काबुक्की झाली. यावेळी भाजपच्या आमदारांनी तालिका अध्यक्षांना शिवीगाळही केल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे सभागृहाचं वातावरण अधिकच तापलं होतं.

इतर बातम्या :

‘राज्यपालांनी विरोधकांचं थोबाड फोडलं पाहिजे, पण ते उत्तेजन देतात’, संजय राऊतांचा घणाघात

‘…मग मुख्यमंत्र्यांना माहिती तरी काय असतं?’ भाजप प्रवक्त्यांचा खोचक सवाल

BJP’s 12 suspended MLAs will be able to vote in Rajya Sabha elections

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.