अमोल कोल्हेंच्या एंट्रीने शिरुरमध्ये राष्ट्रवादीत दोन गट, प्रचारही थंडावला

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसने पहिली यादी जाहीर करत असताना शिरूर आणि मावळ मतदारसंघाच्या उमेदवारांवर सस्पेन्स कायम ठेवलाय. मावळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार आणि शिरूरमध्ये अभिनेता अमोल कोल्हे की राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडे यावरून दोन्ही मतदारसंघामध्ये संभ्रम कायम आहे. ऐनवेळी अमोल कोल्हेंची एंट्री झाल्याने शिरुरमधील इच्छुकांची मात्र अडचण झाली आहे. …

अमोल कोल्हेंच्या एंट्रीने शिरुरमध्ये राष्ट्रवादीत दोन गट, प्रचारही थंडावला

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसने पहिली यादी जाहीर करत असताना शिरूर आणि मावळ मतदारसंघाच्या उमेदवारांवर सस्पेन्स कायम ठेवलाय. मावळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार आणि शिरूरमध्ये अभिनेता अमोल कोल्हे की राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडे यावरून दोन्ही मतदारसंघामध्ये संभ्रम कायम आहे. ऐनवेळी अमोल कोल्हेंची एंट्री झाल्याने शिरुरमधील इच्छुकांची मात्र अडचण झाली आहे.

गेल्या तीन महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विलास लांडे यांना काम करण्यास सांगितलं आणि त्यानंतर विलास लांडे यांनी राष्ट्रवादीच्या प्रचाराला सुरवात केली. पण अचानक अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि त्यानंतर अमोल कोल्हे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. अमोल कोल्हे यांचे नाव आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार थंड पडल्याचं चित्र शिरूर मतदारसंघांमध्ये पाहायला मिळत आहे.

लोकसभा तोंडावर आल्यानंतरही उमेदवार जाहीर न झाल्यामुळे कार्यकर्ते संभ्रमात आहेत. कुणालाही तिकीट द्या, पण लवकर जाहीर करा, असं बोललं जातंय. शिवाय विलास लांडे समर्थकही आक्रमक भूमिकेत दिसत आहेत. विलास लांडेंनी प्रचाराला सुरुवात केली असल्याचं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे.

अमोल कोल्हे हे छत्रपती संभाजी महाराज मालिकेतून लोकप्रिय झाले. त्यांची लोकप्रियता लक्षात घेत विलास लांडे यांनी केलेल्या प्रचारात कोल्हे विजय होतील, अशी राष्ट्रवादीला अपेक्षा आहे. पण उमेदवारीवरुन आता नवा वाद समोर येण्याची शक्यता आहे. या सर्व गोंधळामध्ये राष्ट्रवादीचा प्रचार मात्र थंड पडलाय.

राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर

 • रायगड – सुनील तटकरे
 • बारामती – सुप्रिया सुळे
 • सातारा – उदयनराजे भोसले
 • बुलडाणा – राजेंद्र शिंगणे
 • जळगाव – गुलाबराव देवकर
 • मुंबई उत्तर-पूर्व  – संजय दीना पाटील
 • कोल्हापूर – धनंजय महाडिक
 • परभणी – राजेश  विटेकर
 • ठाणे – आनंद परांजपे
 • कल्याण -बाबाजी पाटील
 • हातकणंगले – स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांना पाठिंबा
 • लक्षद्विप – मोहम्मद फैजल
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *