कोरोना संसर्ग वाढला, पुण्यात खासगी रुग्णालयात 50 टक्के बेड्स आरक्षित, अकोला जिल्ह्यात संचारबंदी

| Updated on: Feb 15, 2021 | 10:06 PM

पुणे शहरात कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी खासगी रुग्णालयांतील 50 टक्के रुग्णालये आरक्षित ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (Neelam Gorhe reserve beds corona patient treatment)

कोरोना संसर्ग वाढला, पुण्यात खासगी रुग्णालयात 50 टक्के बेड्स आरक्षित, अकोला जिल्ह्यात संचारबंदी
कोरोना संसर्ग वाढतोय
Follow us on

पुणे : काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर आता पुन्हा कोरोनाने डोकं वर काढलं आहे. मागील काही दिवसांपासून पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर रुग्णांचा वाढता आलेख लक्षात घेऊन येथील प्रशासनाने सावध पावलं उचलायला सुरुवात केली आहे. पुणे शहरात कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी खासगी रुग्णालयांतील 50 टक्के रुग्णालये आरक्षित ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (Neelam Gorhe ordered to reserve 50 per cent beds in private hospitals for corona patient treatment)

राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता राज्य सरकार तसेच प्रसासन अलर्ट झाले आहे. पुण्यात तर कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी पुण्याच्या महानगरपालिका आयुक्तांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी पुणे शहरातील 50 टक्के रुग्णालय आरक्षित ठेवण्याचे निर्देश दिलेयत. नीलम गोऱ्हे यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे पुण्यात पुढील सहा महिने कोव्हिड रुग्णांसाठी सर्व खासगी रुग्णालयांत जनरल वार्ड तसेच आयसीयूमध्ये 50 टक्के बेड आरक्षित ठेवण्यात येणार आहेत.

अकोला जिल्हात 28 फेब्रुवारी पर्यंत संचारबंदी

अकोला जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी नवे आदेश जारी केले आहेत. त्यांनी अकोला शहर, जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागाकरिता संचारबंदीचे आदेश जारी केले आहेत. नव्या नियमावलीनुसार शहरी व ग्रामीण भागामध्‍ये पाच किंवा त्‍यापेक्षा जास्‍त लोकांनी, जमावाने एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच धार्मिक स्‍वरुपाच्‍या यात्रा, उत्‍सव, समारंभ, महोत्‍सव, संमेलने, सामूहिक कार्यक्रम, सभा, बैठका यांच्यासाठी फक्त 50 व्यक्तींनाच परवानगी देण्यात आली आहे. मिरवणूक आणि रॅली काढण्‍यासही प्रतिबंध घालण्यात आला आहे.

वर्ध्यात 75 विद्यार्थ्यांना कोरोना, वसतिगृह सुरु करण्यावर प्रश्नचिन्ह

वर्ध्यातील हिंगणघाट येथील निवासी वसतिगृहात 75 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे येथे खळबळ उडाली होती. सातेफळ मार्गावर असलेल्या एका खासगी संस्थेच्या निवासी वसतिगृहातील एका विद्यार्थ्याला चार दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर येथे तब्बल 75 विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले होते. या सर्व विद्यार्थ्यांना वसतिगृहातच विलगीकरणात ठेवण्यात आले असून, त्यांच्यावर आरोग्य विभागाकडून उपचार केले जात आहेत.

 

इतर बातम्या :

पुणे आणि नागपुरात कोरोना रुग्णसंख्येचा ब्लास्ट, लोकहो काळजी घ्या, नाहीतर…!

सावधान, पुण्यात कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय, 15 पासून महाविद्यालय सुरु होणार

(Neelam Gorhe ordered to reserve 50 per cent beds in private hospitals for corona patient treatment)