पुणे आणि नागपुरात कोरोना रुग्णसंख्येचा ब्लास्ट, लोकहो काळजी घ्या, नाहीतर…!

गेल्या आठवड्याभरापासून पुणे आणि नागपुरात कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ झालेली पाहायला मिळतीय. | Corona patient

पुणे आणि नागपुरात कोरोना रुग्णसंख्येचा ब्लास्ट, लोकहो काळजी घ्या, नाहीतर...!
पुणे आणि नागपुरात कोरोना रुग्णसंख्या वाढतीय...

नागपूर / पुणे :  गेली वर्षभर कोरोनाने सगळ्या जगाला हैरान केलं. कित्येक महिने तर कोरोनाच्या धास्तीने लॉकडाऊन केलं गेलं. काही दिवसांपासून कोरोना नियंत्रणात येतोय, अशी परिस्थिती निर्माण झाली. मात्र आता नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढलेलं आहे. गेल्या आठवड्याभरापासून पुणे आणि नागपुरात कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ झालेली पाहायला मिळतीय.  (Corona Patient incresing Day by Day  in Nagpur And Pune City)

पुण्यात कोरोनाचा पुन्हा ब्लास्ट

पुणे जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा धोका वाढतोय. शहरात सुमारे महिनाभराच्या खंडानंतर काल पुन्हा एकदा एकाच दिवसांत तीनशेहून अधिक नवे कोरोना रुग्ण आढळून आलेत. शिवाय मागील आठवडाभरापासून दररोज सातत्याने नव्या रुग्णांत वाढ होतेय. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून दररोज प्रसिद्ध होणाऱ्या अहवालातून स्पष्ट होतंय.

पुणे शहरात काल (शनिवारी) दिवसभरात 331 तर जिल्ह्यात मिळून 612 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेत. पुणे शहरात याआधी 20 जानेवारीला एकाच दिवसात 310 नवे रुग्ण सापडले होते. त्यानंतर तब्बल 25 दिवस शहरातील दिवसभरातील नवीन कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने 250 पेक्षाही कमी असे.

नागपुरात कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं

नागपूर शहरात कोरोना रुग्णसंख्येचा ब्लास्ट झालेला पाहायला मिळतोय. गेल्या पाच दिवसांत 1717 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झालेली पाहायला मिळतीय. ही वाढ गेल्या 2 महिन्यांतील सर्वाधिक वाढ आहे. राज्यातील कोरोनाचे आकडे कमी होत असताना नागपुरात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या ही बाब प्रशासनाची चिंता वाढवणारी आहे.

नागपूर जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढ कायम असल्याचं पाहायला मिळतंय. जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 486 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोना रुग्णवाढीमुळे मनपा प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आहे.

मंगल कार्यालय, लॅानमधील लग्न समारंभावर मनपाचा वॅाच असणार आहे. जास्त गर्दी असल्यास मंगल कार्यालय तसंच लॅान सील करण्याचा इशारा मनपा आयुक्त राधाकृष्ण बी यांनी दिला आहे.
तसंच इमारतीत कोरोना रुग्ण आढळल्यास, सर्वांना चाचणी करणे अनिवार्य असल्याचंही त्यांनी सांगितलंय.

नागपूर मनपा मुख्यालयातच कोरोना नियमांची ऐशीतैशी

नागपूरच्या मनपा मुख्यालयातच कोरोनाच्या नियामांचं पालन होताना दिसून येत नाहीय. मनपा मुख्यालयातले कर्मचारी विनामास्क वावरताना दिसून येत आहेत. तसंच धक्कादायक बाब म्हणजे पालिका आयुक्तांच्या केबीनबाहेर विनामास्क कर्मचारी दिसून येतात. या निमित्ताने शहरात विनामास्कची कारवाई करणाऱ्या मनपाच्या दिव्याखाली अंधार असल्याचं बोललं जातंय. या सगळ्या प्रकारावर मनपाचे विधी सभापती धर्मपाल मेश्राम यांनी कारवाईची मागणी केली आहे.

हे ही वाचा :

नागपुरात वाढता कोरोनाचा संसर्ग, प्रशासनाने घेतला मोठा निर्णय