ठाकरेंच्या शिवसेनेबाबत नीलम गोऱ्हेंचे धक्कादायक विधान, दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं

Neelam Gorhe On Uddhav Thackeray: ठाकरे यांच्या शिवसेनेत दोन मर्सिडीजवर एक पद मिळत होते, प्रत्येक सभेला ठाण्यात माणसे येत होती. त्यांची लोक संपूर्ण तयारी करत होते. आता उद्धव ठाकरे गटाचे लोकही समोर नाही. २०१४ नंतर काही गोष्टी बदलल्या गेल्या.

ठाकरेंच्या शिवसेनेबाबत नीलम गोऱ्हेंचे धक्कादायक विधान,  दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं
Jitendra Zavar | Updated on: Feb 23, 2025 | 2:44 PM

Neelam Gorhe On Uddhav Thackeray: अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नवी दिल्लीत सुरु आहे. या संमेलनात राजकारणातील मोठी बातमी मिळाली आहे. संमेलनात ‘असे घडलो आम्ही’ या परिसंवादात शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी धक्कादायक विधान केले आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत एक पदासाठी दोन मर्सिडीज द्यावा लागत होत्या, असे खळबळजनक विधान नीलम गोऱ्हे यांनी केले आहे. नीलम गोऱ्हे यांच्या या वक्तव्यानंतर राजकारणात पुन्हा एक मोठा भूकंप झाला आहे. त्यावर ठाकरेंच्या शिवसेनेकडून पलटवार करण्यात आला आहे.

नीलम गोऱ्हे नेमके काय म्हणाल्या

नीलम गोऱ्हे म्हणाल्या, ठाकरे यांच्या शिवसेनेत दोन मर्सिडीजवर एक पद मिळत होते, प्रत्येक सभेला ठाण्यात माणसे येत होती. त्यांची लोक संपूर्ण तयारी करत होते. आता उद्धव ठाकरे गटाचे लोकही समोर नाही. २०१४ नंतर काही गोष्टी बदलल्या गेल्या. काही लोकांना सातत्याने घेणे सुरु झाले. बाळासाहेब ठाकरे यांचे पक्ष संघटनेवर लक्ष होते. त्यानंतर ते राहिले नाही. लोकांना भेटले गेले पाहिजे. ते होत नव्हते.

नीलम गोऱ्हे यांच्या वक्तव्यावर संजय राऊत यांनी पलटवार केला. ते म्हणाले, नीलम गोऱ्हे यांना चार वेळा विधानपरिषदेचे आमदार केले. त्यांनी किती मर्सिडीज दिल्या, त्याच्या पावत्या दाखवाव्या. त्यावर नीलम गोऱ्हे म्हणाले, मला आमदारकी मिळावी म्हणून संजय राऊत यांनी प्रयत्न केले.

मी काहीच दिले नाही. मला एक रुपया पक्षाने मागितले नाही. त्याबद्दल मी बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे ऋणी आहे. माझ्यासारखे अपवाद सोडले तर या गोष्टी घडत होत्या. व्यक्ती म्हणून उद्धव साहेब संस्कृत नेते आहे. परंतु त्यांना वेळेचे नियोजन करता आले नाही, असे नीलम गोऱ्हे यांनी म्हटले.

नीलम गोऱ्हे यांच्या विधानावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहे. अंबादास दानवे यांनी म्हटले की, मी ग्रामीण भागातील सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. पक्षाने नेहमी मला निधी दिला. माझ्याकडे कधीही पैसे मागितले नाही. नीलम गोऱ्हे यांची ही नमकहरामी आहे.

Follow Us