NEET Exam 2026 Paper Leak: मोटेगावकरचा नवा प्रताप! तांब्यात पाणी घेतलं अन्… नको तो व्हिडीओ आला समोर

NEET Exam 2026 Paper Leak: ध्या देशभरात नीट पेपर फुटीचे प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. या प्रकरणातील महत्त्वाचा आरोपी शिवराज मोटेगावकरचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने केलेल्या कृत्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

NEET Exam 2026 Paper Leak: मोटेगावकरचा नवा प्रताप! तांब्यात पाणी घेतलं अन्... नको तो व्हिडीओ आला समोर
Shivraj Motegaonkar
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: May 24, 2026 | 10:50 AM

देशभरातील नीट पेपरफुटी प्रकरणात दिवसेंदिवस धक्कादायक माहिती समोर येत आहे. या प्रकरणाची सुरुवात राजस्थानमधून होऊन त्याचे धागेदोरे महाराष्ट्रातील वेगवेगळ्यात जिल्ह्यात सापडले आहेत. या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा आरोपी शिवराज मोटेगावकरला सीबीआयने पुण्यातून अटक केली आहे. तो ‘रेणुकाई करिअर सेंटर’ (RCC)चा संचालक असून मुलासाठी त्याने पेपर विकत घेतल्याचे बोलले जात आहे. मोटेगावकरची सध्या चांगलीच चौकशी सुरु आहे. दरम्यान, त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये विज्ञानाचा प्राध्यापक मोटेगावकर अंधश्रद्धेच्या आहारी गेल्याचे पाहायला मिळत आहे.

व्हिडिओमधील धक्कादायक प्रकार

सध्या इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक अतिशय धक्कादायक आणि आश्चर्यकारक दृश्य पाहायला मिळत आहे. प्राध्यापक मोटेगावकर चक्क वर्गातील डेक्सवर उभे असल्याचे दिसत असून त्यांच्या एका हातात पाण्याचा तांब्या आणि दुसऱ्या हातात आंब्याची पाने आहेत. ते या आंब्याच्या पानांनी तांब्यातील पाणी समोर बसलेल्या विद्यार्थ्यांच्या अंगावर शिंपडत आहेत. एवढेच नाही तर, पाणी शिंपडताना ते विद्यार्थ्यांना उद्देशून म्हणत आहेत की, तुम्ही एम्स (AIIMS) ला लागणार आहात आणि हा योग खूप वर्षानंतर आला आहे.

विज्ञानाचा वर्ग की अंधश्रद्धेचा अड्डा?

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर समाजातून आणि विशेषतः विज्ञानवाद्यांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या प्रकरणातील सर्वात मोठा विरोधाभास म्हणजे हा प्रकार एका विज्ञान शिकवणाऱ्या वर्गात घडला आहे. एम्स ही भारतातील सर्वोच्च वैद्यकीय संस्था आहे. तिथे प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना जीवशास्त्र, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र यांसारख्या वैज्ञानिक विषयांचा सखोल अभ्यास करावा लागतो. मात्र, देशाचे भावी डॉक्टर घडवण्याची जबाबदारी असलेल्या एका प्राध्यापकानेच अशा प्रकारे पाणी शिंपडून यश मिळेल असा समज पसरवणे, हे फार चुकीचे आहे.

नेटकऱ्यांचा संताप आणि उपस्थित होणारे प्रश्न

या व्हायरल व्हिडिओनंतर सोशल मीडियावर अनेक संतप्त प्रतिक्रिया आणि प्रश्न उपस्थित केले जात आहेत. जे प्राध्यापक स्वतः विज्ञानाचे धडे देतात, त्यांचाच वैज्ञानिक दृष्टिकोनावर विश्वास नाही का, असा सवाल नेटकरी विचारत आहेत. अशा कृतींमधून आपण उद्याच्या पिढीला आणि भावी डॉक्टरांना कोणता संदेश देत आहोत, ही मोठी चिंतेची बाब आहे. यशासाठी केवळ अथक परिश्रम आणि सातत्यपूर्ण अभ्यास आवश्यक असतो, हे शिकवण्याऐवजी अशा प्रकारांना प्रोत्साहन देणे कितपत योग्य आहे, असा मुद्दाही नागरिक मांडत आहेत.

Follow Us