महाराष्ट्रात नीटचा पेपर फुटला, आता राज्याचा निकाल काय? टॉपरमध्ये कोण कोण?

neet exam result : नीटफुटीनंतर घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी चांगली कामगिरी केली.

महाराष्ट्रात नीटचा पेपर फुटला, आता राज्याचा निकाल काय? टॉपरमध्ये कोण कोण?
| Updated on: Jul 17, 2026 | 11:29 AM

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने नीट युजी 2026 निकाल जारी करण्यात आला आहे. नीटचा पेपर लीक झाल्यानंतर पुन्हा घेण्यात आलेल्या परीक्षेत 20 लाख विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. या परीक्षेत 11.21 लाख म्हणजे 56 टक्के विद्यार्थी परीक्षेत पात्र झाले आहेत. यात पंजाबच्या विद्यार्थ्याने सर्वात चांगली कामगिरी केली आहे. तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनीही जोरदार कामगिरी केल्याचं समोर आलं आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी टॉप 17 मध्येही स्थान मिळवलं आहे.

महाराष्ट्रातील श्रावणी कुदळे या विद्यार्थिनीने चांगली कामगिरी करत देशात मुलींमध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे. तर राज्यात पाचवा क्रमांक पटकावला आहे. मोहनेश भोसले या विद्यार्थ्याने देशात दहावा क्रमांक पटकावला आहे. तर राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. नीट परीक्षा (Neet Exam) फुटीनंतर पुन्हा परीक्षा आयोजित करण्यात आली होती. पेपर फुटीनंतर विद्यार्थ्यांनी तणावात परीक्षा दिली. त्यानंतरही विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगलं यश मिळालं आहे. राज्यातील सानिध्या डोंगरे या विद्यार्थिनीने 28 वा क्रमांक पटकावला आहे. अर्णव लाहोटी या विद्यार्थ्यानेही चांगलं यश संपादन केलं आहे. प्रणव टेंभुर्ण या विद्यार्थ्याने चांगल्या अभ्यासाच्या जोरावर 33 वा क्रमांक पटकावला आहे. तर रश्मीत गुप्ता यानेही चांगली कामगिरी करत 34 वा क्रमांक पटकावलाय.

सोहम पाटील या विद्यार्थ्याचं सर्वत्र कौतुक होत आहे. सोहमने परीक्षेत 53 वा क्रमांक पटकावला आहे. तर सागर कारेकर या विद्यार्थ्यानेही 67 वा क्रमांक मिळवला आहे. तर सुमय्या बडोलेने 77 वा क्रमांक प्राप्त केला. अनुश्री थोरातने 85 वा क्रमांक मिळवला. तर आर्या दिवकेरने 90 वे स्थान मिळवलं.

महाराष्ट्रात कोणत्या विद्यार्थ्यांनी मारली बाजी?

अतुल्या बाळासाहेब डोंगरे

श्रावणी कृष्णा कुदळे

मोहनीश मारुती भोसले

सार्थक महेश पाटील

सानिध्यां क्षितिज डोंगरे

अर्णव लाहोटी

प्रणव पुरणलाल टेम्भूर्णे

रौशमीत गुप्ता

सोहम निशिकांत पाटील

सागर राजेश करीकर

सौम्या बदोले

अनुश्री अजय थोरात

आर्या अभिजित दिवेकर

सहिम सादिक पटवेगार

सुहाना सलीम शेख

अमीर वरावल्लाह

सार्थक पेठकर

श्रीवल्लभ विष्णुपंत गावडे

Follow Us