शिवराज मोटेगावकर याचा नवा कारनामा, पुण्यातील वारजे भागात कोट्यवधीची जागा
नीट पेपर फुट प्रकरणात सीबीआयने अटक केलेल्या आरसीसी कोचिंग क्लासचे संचालक शिवराज मोटेगावकर याच्या मालमत्ते संदर्भात रोज नवनव्या घडामोडी उघड होत आहेत.

आरसीसी कोचिंग क्लासचे संचालक शिवराज मोटेगावकर यांनी पुण्यातील हवेली तालुक्यातील वारजे भागात ५१ गुंठे घेतली असल्याचे उघडकीस आले आहे. ही जागा अगदी मोक्याच्या ठिकाणी असून तिचे बाजारमुल्य देखील जास्त आहे. ही जमीन सामाजिक संस्थेच्या नावाने विकत घेतली असून या जागेच्या फलकावर मोटेगावकर याचे नाव काळ्या रंगाने झाकले असल्याचेही उघडकीस आले आहे. शिवराज मोटेगावकर याच्याकडे इतकी माया आली कुठून असा सवाल केला जात आहे.
राजर्षी शाहु महाराज बहुउद्देशीय सामाजिक विकास, महाराष्ट्र लातूर, याच भागात त्याचे दोन प्लॉट आहेत. ५१ गुंठे जागा आपल्याला पाहायला मिळत आहेत. याच भागात महापालिकेचा रस्ता आहे. हा रस्ता देखील शिवराज मोटेगावकर याला आपल्या ताब्यात घ्यायचा होता. मात्र, येथील नागरिकांनी आंदोलन करुन हा त्याचा डाव हाणून पाडल्याची येथील स्थानिकांनी सांगितले आहे. दोन प्लॉटमधील हा महापालिकेचा रस्ता त्याने हडपण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, सामाजिक भान असलेल्या नागरिकांना विरोध केल्याने हा रस्ता वाचल्याचे म्हटले जात आहे.शिवराज मोटेगावकर याच्याकडे इतकी कोट्यवधी रुपायांची जमीन घेण्यासाठी आलेला पैसा हा कोचिंग क्लासेसच्या माध्यमातूनच कमावला की पेपर फुटीतून हा पैसा मिळाला असा सवाल केला जात आहे.