AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! मुंबई विमानतळावरील नेटवर्क अचानक ठप्प, प्रवाशांची मोठी गर्दी

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरीवल नेटवर अचानकपणे ठप्प झाले आहे. त्यामुळे चेक-इन व बोर्डिंग ‘मॅन्युअल मोड’वर गेले असून येथे प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे.

मोठी बातमी! मुंबई विमानतळावरील नेटवर्क अचानक ठप्प, प्रवाशांची मोठी गर्दी
mumbai airport
| Updated on: Aug 09, 2025 | 5:46 PM
Share

Mumbai Airport: पावसाळ्यात मुंबईच्या लोकलचे वेळापत्रक हमखास खोळंबलेले पाहायला मिळते. रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणात वाहनांचे ट्रॅफिक झालेले दिसते. दरम्यान, आता मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर नेटवर्क अचानकपणे ठप्प झाले आहे. अचानक नेटवर्क ठप्प झाल्याने येथे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. परिणामी येथे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष या सर्व्हर डाऊनमुळे अनेक खासगी हवाई वाहतूक कंपन्यांना मोठा फटका बसत आहे. त्यामुळे ही तांत्रिक अडचणू दूर करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न चालू असल्याचे बोलले जात आहे.

खासगी विमान वाहतूक कंपन्यांना मोठा आर्थिक फटका

मुंबईच्या विमानतळावरील सर्व्हरच डाऊन झाल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे विमानांचे उड्डाणही उशिराने होत आहे. या तांत्रिक अडचणीमुळे इंडिगो, एयर इंडिया, अकासा, विस्तारा या विमान कंपन्यांना मोठा आर्थिक तसेच अन्य फटका बसत आहे. तांत्रिक बिघाडामुळे मुंबई विमानतळावर हळू हळू प्रवाशांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे आता हा तांत्रिक बिघाड दूर करून सर्व्हर पुन्हा पुर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी प्रवाशी करत आहेत.

आयटी विभागाकडून बिघाड दूर करण्याचा प्रयत्न

मिळालेल्या माहितीनुसार मुंबईच्या या आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्व्हर डाऊन झाल्यामुळे चेक-इन व बोर्डिंगची संपूर्ण प्रक्रिया ‘मॅन्युअल मोड’वर वळवण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सामानाची तपासणी करण्यासाठी वेळ लागत आहे.  विमानतळावर अचानक नेटवर्क फेल्युअरची समस्या निर्माण झाली आहे. हा तांत्रिक बिघाड निदर्शनास येताच आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रशासनाकडून ही अडचण दूर करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. विमानतळाची IT आणि कोअर टीमकडून नेटवर्क दुरुस्तीचे प्रयत्न सुरू आहेत. सर्वच विभागांना SOP नुसार ‘कंटिजन्सी’ प्रक्रिया राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

प्रवासांचा मनस्ताप, बिघाड दूर करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न

दरम्यान, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर हा बिघाड नेमका कशामुळे झाला, याचे कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र सर्व यंत्रणा सुरळीत चालू असतानाच अचानकच सर्व्हर ठप्प झाल्याचे सांगण्यात येत आहे. विमानतळावरील आयटी टीम नेमकी अडचण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. लवकरच हा बिघाड दूर होऊन सर्व यंत्रणा पूर्ववत होईल, असे सांगितले जात आहेत. या सर्व प्रक्रियेत मात्र प्रवाशी खोळंबले असून त्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

Follow Us
अखेर तेच घडलं! राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का? NCP नेत्याचा...
अखेर तेच घडलं! राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का? बड्या NCP नेत्याचा भाजपला पाठिंबा?
संकष्ट चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
Pune | संकष्ट चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
CJP च्या मोठ्या हालचाली, संभाजीनगरात 15 ते 20 प्रमुख सदस्य... पुन्हा
CJP च्या मोठ्या हालचाली, संभाजीनगरात 15 ते 20 प्रमुख सदस्य... पुन्हा देशभराचं लक्ष वेधणार?
थेट एकनाथ शिंदेंशी पंगा! पुन्हा भाजप नेत्याचं सुचक विधान, महायुतीत...
Eknath Shinde | थेट एकनाथ शिंदेंशी पंगा! पुन्हा भाजप नेत्याचं सुचक विधान, महायुतीत खडाजंगी
बाळासाहेबांसह, आनंद दिघे सुद्धा गायब! शिंदेंच्या बॅनरवर अमित शहांचा...
बाळासाहेबांसह, आनंद दिघे सुद्धा गायब! शिंदेंच्या बॅनरवर अमित शहांचा भलामोठा फोटो पाहून राऊत संतापले
अंगावर भागलपुरी शाल, कानांवर रुमाल अन्... एका मतासाठी BMC तील नगरसेवक
अंगावर भागलपुरी शाल, कानांवर रुमाल अन्... एका मतासाठी भाजपनं BMC तील नगरसेवकाला रुग्णालयातून आणलं, Video व्हायरल
देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेल्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण?
देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेल्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण? बड्या नेत्याचं भाकित ऐकून चकित व्हाल
पुन्हा केंद्र सरकारचं टेन्शन वाढलं? मोर्चा थेट पंतप्रधानांच्या निवास..
पुन्हा केंद्र सरकारचं टेन्शन वाढलं? मोर्चा थेट पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे... नेमकं प्रकरण काय?
एरवी सर्व विषयांवर बोलणारे शहा प्रधानांच्या विषयावर गप्प, म्हणजे...
एरवी सर्व विषयांवर बोलणारे शहा प्रधानांच्या विषयावर गप्प, म्हणजे... फडणवीसांचा उल्लेख करत बड्या नेत्याचा धक्कादायक दावा
धनंजय मुंडेंचा कमबॅक? आता चमत्कार दाखवावा लागेल, येणारा काळ आपलाच...
धनंजय मुंडेंचा कमबॅक? आता चमत्कार दाखवावा लागेल, येणारा काळ आपलाच... मुंडेंच्या भाषणाची जोरदार चर्चा