चियर्स… आज 31 डिसेंबर, मेट्रोतून बिनधास्त फिरा, मोठी घोषणा काय ? एक्सप्रेसचे उद्या पासून नवे नियम काय? या गोष्टी माहीतच हव्या…

31 डिसेंबर आणि नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी महत्त्वाचे अपडेट्स! मुंबई मेट्रो-1 च्या फेऱ्यांमध्ये वाढ, वर्सोवा-घाटकोपर मार्गावर उशिरापर्यंत सेवा उपलब्ध. 1 जानेवारीपासून नवीन रेल्वे वेळापत्रक लागू होईल, प्रवासापूर्वी तपासा. तसेच, 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलीस बंदोबस्त वाढवला असून, नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

चियर्स… आज 31 डिसेंबर, मेट्रोतून बिनधास्त फिरा, मोठी घोषणा काय ? एक्सप्रेसचे उद्या पासून नवे नियम काय? या गोष्टी माहीतच हव्या…
31 डिसेंबरच्या रात्री मेट्रोतून बिनधास्त फिरा, मोठी घोषणा
| Updated on: Dec 31, 2025 | 8:26 AM

आज 31 डिसेंबर… वर्षाचा शेवटचा दिवस. अवघ्या काही तासांतच नवं वर्ष सुरू होईल. पण त्याआधी सगळ्यांचे प्लान्स सुरू असतील ते 31च्या सेलिब्रेशने. वाढत्या गर्दीमुळे काही लोकं घरातच बसून ण-पइण, गप्पा मरात, कुटुंबीय किंवा मित्र-मैत्रिणींसोबत सेलिब्रेशनचा प्लान आखतील. मात्र काही जणांचा बाहेर पडून एखाद्या हॉटेलमध्ये जाऊन मजा-मस्तीचा प्लान ठरेल. तुम्ही जर या दुसऱ्या कॅटेगरीत येत असाल तर ही बातमी नक्की वाचा. कारण घरी परत येताना ट्रेनचं, मेट्रोचं वेळापत्रक ताय आहे, मोठी घोषणा काय करण्यात आली आहे. ते तर जाणून घ्या..

नववर्षाच्या पूर्वसंध्येला मेट्रो-1 ची मोठी घोषणा

नववर्षाच्या जल्लोषाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड (MMOPL) ने मेट्रो-1च्या सेवांमध्ये वाढ जाहीर केली आहे. त्यानुसार, 31 डिसेंबर -1 जानेवारीदरम्यान 28 अतिरिक्त फेऱ्या होतील.

▪️ एकूण मेट्रो फेऱ्या : 504 होतील

▪️ शेवटच्या मेट्रोची वेळ

▪️ वर्सोवा : रात्री 2.14 (1 जानेवारी 2026)

▪️ घाटकोपर : रात्री 2.40 (1 जानेवारी 2026)

सेवांचा कालावधी (फ्रिक्वेन्सी)

▪️ गर्दीच्या वेळेत : 3 मिनिटे 20 सेकंद
▪️ कमी गर्दीच्या वेळेत : 5 मिनिटे 55 सेकंद
▪️ उशिरा रात्रीच्या 28 अतिरिक्त फेऱ्यांसाठी : 12 मिनिटे अंतराने सेवा असेल.

नवीन वर्षापासून नवीन रेल्व वेळापत्रक लागू

दक्षिण मध्य रेल्वेकडून नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच, म्हणजेच 1 जानेवारीपासून नवीन रेल्वे वेळापत्रक लागू करण्यात येणार आहे. यानुसार काही रेल्वेंच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. यात प्रामुख्याने जनशताब्दी एक्स्प्रेस, हिंगोली- मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस यासह अनेक रेल्वेंच्या येण्याच्या आणि जाण्याच्या वेळांमध्ये बदल झाला आहे. प्रवाशांनी प्रवास सुरू करण्यापूर्वी भारतीय रेल्वेच्या चौकशी प्रणाली, रेल्वेचे अधिकृत संकेतस्थळ, स्टेशन चौकशी कार्यालय किंवा स्टेशन मास्टर यांच्याकडून नवीन वेळापत्रकाची माहिती घ्यावी. ज्या प्रवाशांनी 1 जानेवारी किंवा त्यानंतरचे तिकीट आरक्षित केले आहे, त्यांनी संबंधित रेल्वेगाड्यांची अद्ययावत वेळेची तपासणी करण्याचे आवाहन दक्षिण-मध्य रेल्वेने केले आहे.

31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पोलीस अलर्ट मोडवर, ठिकठिकाणी नाकाबंदी

सांगली पोलिसांकडून 31 डिसेंबर आणि सांगली महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात येत आहे. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्याकडून स्वतः नाकाबंदीची तपासणी करण्यात येत आहे. शहरात ठिकठिकाणी सांगली पोलीस दलाकडून नाकाबंदी करत वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. आचारसंहितेचे काटेकोर पालन व्हावं आणि 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था रहावी यादृष्टीने ही नाकाबंदी करण्यात येत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिली.