लग्नाआधी मुलीची कौमार्य चाचणी, कंजारभाट समाजाची किळसवाणी परंपरा सुरुच, NHRC ची नोटीस

| Updated on: Mar 08, 2021 | 9:35 PM

महाराष्ट्रात अजूनही कंजारभाट समाजात मुलीची लग्नाआधी कौमार्य चाचणी केली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे (NHRC send notice to Maharashtra government on Virginity test).

लग्नाआधी मुलीची कौमार्य चाचणी, कंजारभाट समाजाची किळसवाणी परंपरा सुरुच, NHRC ची नोटीस
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

मुंबई : महाराष्ट्रात अजूनही कंजारभाट समाजात मुलीची लग्नाआधी कौमार्य चाचणी केली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (NHRC) याबाबत गंभीर दखल घेतली आहे. एनएचआरसीने राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांना याबाबतचा रिपोर्ट पाठवण्याचे आदेश दिले आहेत. कौमार्य चाचणीची प्रथा रोखण्यासाठी राज्य सरकारकडून कोणकोणते प्रयत्न केले गेले, याची सविस्तर माहिती सादर करण्याचे आदेश एनएचआरसीने दिले आहेत. सुप्रीम कोर्टाचे वकील राधाकांत त्रिपाठी यांच्या तक्रारीनंतर एनएचआरसीने संबंधित आदेश दिले आहेत (NHRC send notice to Maharashtra government on Virginity test).

वकिलांचं म्हणणं काय?

महाराष्ट्रात कंजारभाट समाजातील मुलींना अद्यापही कौमार्य चाचणीला सामोरे जावे लागत आहे, असा दावा वकिलांनी केला आहे. “मुलीने लग्नाआधी शारीरीक संबंध ठेवले असतील तर तिला निर्दयीपणे मारहाण केली जाते. या अशाप्रकारच्या प्रथेला रोखण्यासाठी व्हाट्सअॅपवर एक ग्रुप तयार करण्यात आला आहे. ग्रुपमधील एका सदस्याने सांगितलं होतं की, पंचायतच्या सदस्यांनी कौमार्य चाचणीत पास करण्यासाठी एका जोडप्याकडून लाच घेतली होती”, असं वकील त्रिपाठी यांनी सांगितलं (NHRC send notice to Maharashtra government on Virginity test).

वकिलांचा अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

प्रशासकीय अधिकारी देखील याबाबत माहिती असून सुद्धा दुर्लक्ष करतात, असा आरोप त्रिपाठी यांनी केला आहे. “अधिकाऱ्यांना याबाबत माहिती मिळूनदेखील ते डोळेझाक करतात. ते या प्रकरणी कोणतीही कारवाई करत नाहीत”, असा आरोप त्रिपाठी यांनी केला आहे.

अधिकाऱ्यांचं म्हणणं काय?

दरम्यान, एनएचआरसीच्या आदेशानंतर अधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कौमार्य चाचणीबाबतची माहिती मिळाल्यानंतर प्रशासनाने स्वयंसेवक आणि सामाजिक संघटनांच्या मदतीने कंजारभाट समाजामध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अधिकाऱ्यांनी ही प्रथा रोखण्यासाठी कोणती कडक पावलं उचलली याचा उल्लेख केलेला नाही.

पिंपरी चिंचवडमध्ये पहिली घटना

कौमार्य चाचणीची पहिली घटना 2018 मध्ये चर्चेत आली होती. पिंपरी-चिंचवडमध्ये एका मुलीला या घाणेरड्या प्रथेला बळी पडावं लागलं होतं. नवरदेवच्या बाजूची मंडळी कौमार्य चाचणीवर अडून बसले होते. त्यानंतर हतबल झालेल्या मुलीला या प्रथेच्या बळी पडावं लागलं होतं. मात्र, मुलाने कौमार्य चाचणी केल्यानंतर मुलीला नाकारलं होतं. त्यानंतर मुलीच्या घरच्यांवर समाजाने बहिष्कार टाकला होता.

हेही वाचा : महाराष्ट्रातील तीन शहरं लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर, तुमच्या शहरातील कोरोना स्थिती काय?