कोरोना रुग्णवाढीचा वेग वाढला, नाशिकमध्ये संचारबंदी लागू, छगन भुजबळांकडून घोषणा

| Updated on: Feb 21, 2021 | 6:24 PM

तर नाशिक शहरात कडक निर्बंध लागू करणार, असेही भुजबळ यांनी सांगितले. (Night Curfew in Nashik announce Chhagan Bhujbal) 

कोरोना रुग्णवाढीचा वेग वाढला, नाशिकमध्ये संचारबंदी लागू, छगन भुजबळांकडून घोषणा
छगन भुजबळ, अन्न व नागरी पुरवठा मंत्री
Follow us on

नाशिक : नाशिक शहरात कोरोना रुग्णांच्या सख्येत वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिक शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. उद्या रात्री 11 ते सकाळी 5 पर्यंत शहरात ही संचारबंदी असणार आहे, अशी घोषणा अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली. येत्या आठ दिवसात रुग्णसंख्या आटोक्यात आली नाही, तर नाशिक शहरात कडक निर्बंध लागू करणार, असेही भुजबळ यांनी सांगितले. (Night Curfew in Nashik announce Chhagan Bhujbal)

नाशिकमधील कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. गेल्या पाच दिवसात 534 रुग्ण वाढले आहेत.  यात सर्वाधिक रुग्ण हे नाशिक शहरात आढळले आहे. कोरोना रुग्ण वाढीचा वेगही वाढला आहे. त्यामुळे नाशिकमध्ये ठोस उपाययोजना करणे बंधनकारक आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये रात्रीची संचारबंदी लावण्यात आली आहे.

जर कोरोना आटोक्यात आला नाही तर नियम तीव्र करु, असा इशाराही भुजबळ यांनी दिला. यापुढे नागरिकांनी मास्क लावला नाही तर 1000 रुपये दंड आकारला जाईल. तसेच त्यांच्या विरुद्ध गुन्हाही दाखल करु, असे छगन भुजबळ म्हणाले.

त्याशिवाय लग्न सोहळा करणाऱ्यांनी पोलीस परवानगी घेणे आवश्यक आहे. गोरज मुहुर्तवरील लग्न टाळा, असे आवाहनही पालकमंत्री यांनी केले. ज्या दुकानात सॅनिटायझर नसेल तर दंड करा, अशा सूचनाही मनपा अधिकाऱ्यांना करण्यात आल्या आहेत. तसेच शाळा जैसे थे सुरु राहणार आहेत. येत्या 8 दिवस बघून शाळांबाबत निर्णय घेऊ, असेही भुजबळांनी सांगितले.  (Night Curfew in Nashik announce Chhagan Bhujbal)

अमरावतीत आठवडाभरासाठी लॉकडाऊन

दरम्यान अमरावतीत येत्या आठवड्यात लॉकडाऊन असणार आहे. हा लॉकडाऊन सोमवारी ( 22 फेब्रुवारी) संध्याकाळी आठ वाजेपासून अमरावती शहर, अचलपूर शहर आठवड्याभरासाठी घोषित करण्यात आला आहे. हा लॉकडाऊन सात दिवसांसाठी असणार आहे. विशेष म्हणजे राज्यात अनलॉकनंतर हा पहिलाच लॉकडाऊन असेल. राज्याच्या महिला आणि बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी मोठी घोषणा केली आहे.

“सगळ्यांची काळजी घेण्याची गरज असल्याने हा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. कोरोना मृत्यू दर हा सध्या 1.6 टक्के इतका आहे. आम्हाला नाईलाजाने फक्त जीवानाश्यक वस्तू सुरु ठेवावी लागणार आहेत. अमरावती शहरात पूर्ण कंटेन्मेंट झोन घोषित करुन लॉकडाऊन घोषित करण्यात येत आहे. शहरातील बाजार हे गाईडलाईन्सनुसारच सुरु राहतील”, असं यशोमती ठाकूर यांनी सांगितलं. (Night Curfew in Nashik announce Chhagan Bhujbal)

संबंधित बातम्या : 

आमच्याकडे पर्याय नाही, नाहीतर कोरोना वाढेल, हजारो लोकं रस्त्यावर मरतील : यशोमती ठाकूर

औरंगाबादेत कोरोनाची लस घेतलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यानं खळबळ