AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी : अमरावतीत आठवडाभरासाठी लॉकडाऊन, मंत्री यशोमती ठाकूर यांची घोषणा

राज्याच्या महिला आणि बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी मोठी घोषणा केली आहे (Minister Yashomati Thakur declare lockdown in Amravati)

मोठी बातमी : अमरावतीत आठवडाभरासाठी लॉकडाऊन, मंत्री यशोमती ठाकूर यांची घोषणा
Minister Yashomati Thakur
| Updated on: Feb 21, 2021 | 4:41 PM
Share

अमरावती : राज्याच्या महिला आणि बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी मोठी घोषणा केली आहे. अमरावतीत येत्या आठवड्यात लॉकडाऊन असणार आहे. हा लॉकडाऊन सोमवारी ( 22 फेब्रुवारी) संध्याकाळी आठ वाजेपासून अमरावती शहर, अचलपूर शहर आठवड्याभरासाठी घोषित करण्यात आला आहे. हा लॉकडाऊन सात दिवसांसाठी असणार आहे. विशेष म्हणजे राज्यात अनलॉकनंतर हा पहिलाच लॉकडाऊन असेल (Minister Yashomati Thakur declare lockdown in Amravati).

यशोमती ठाकूर नेमकं काय म्हणाल्या?

“सगळ्यांची काळजी घेण्याची गरज असल्याने हा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. कोरोना मृत्यू दर हा सध्या 1.6 टक्के इतका आहे. आम्हाला नाईलाजाने फक्त जीवानाश्यक वस्तू सुरु ठेवावी लागणार आहेत. अमरावती शहरात पूर्ण कंटेन्मेंट झोन घोषित करुन लॉकडाऊन घोषित करण्यात येत आहे. शहरातील बाजार हे गाईडलाईन्सनुसारच सुरु राहतील”, असं यशोमती ठाकूर यांनी सांगितलं.

“स्वत:ची काळजी घेण्याची गरज आहे. सगळ्यांनी समाजाची काळजी घेण्याची गरज आहे. मास्क मोठ्या प्रमाणात वापरण्याची गरज आहे. अंतर ठेवण्याची गरज आहे. त्याचबरोबर सातत्याने हात धुवून स्वत: ला सुरक्षित करण्याची गरज आहे. यामध्ये जर कुणी आंदोलन करण्याचं किंवा राजकीय काही करायचं ठरवलं तर त्याच्यावर गुन्हे दाखल होऊन कारवाई होईल”, असं त्यांनी सांगितलं.

“आम्ही सगळ्यांकडून मदत मागत आहोत. नगरसेवकांकडेही मदत मागितली आहे. अमरावती आणि अचलपूर महापालिका यांचीही मदत मागितली आहे”, अशी माहिती त्यांनी दिली.

12 कंटेन्मेंट झोन घोषित

अमरावतीची परिस्थिती पाहाता अमरावती महानगरपालिकाने अमरावती शहरात 12 कंटेन्मेंट झोन घोषित केले आहेत. या प्रतिबंधित क्षेत्रातील रहिवाशांना 14 दिवसापर्यंत घराच्या बाहेर निघता येणार नसून हे प्रतिबंधित क्षेत्र आहे, असे आदेश प्रशासनाने दिला आहे. तर, या ठिकाणी बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. या 12 प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये सर्वात जास्त रुग्ण आढळल्याने हा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतला.

अमरावतीत 2,783 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण

अमरावती मनपा हद्दीत सध्या 2,783 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण असून अमरावती शहराला कोरोनाने पूर्णपणे विळखा घातला असल्याची माहिती मनपा आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिली. तर अमरावती जिल्ह्यात आज तब्बल 727 रुग्ण पॉझिटीव्ह आढळूण आले आहेत. आज 2,131 रुग्णांच्या टेस्ट झाल्या. जिल्ह्याचा पॉझिटीव्हिटी दर 34.11 टक्क्यांवर पोहोचला. आज एकूण 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 460 रुग्णांचा मृत्यू झाला आहे (Yashomati Thakur Gave Signs About Lockdown In Amaravati).

अचलपूर-परतवाडा सर्वात मोठा हॉट स्पॉट

अमरावती जिल्ह्यातील अचलपूर-परतवाडा सर्वात मोठा हॉट स्पॉट ठरला आहे. 359 रुग्ण घेत आहेत, अशी माहिती उपचार उपविभागीय अधीकार्‍यांनी दिली. अचलपूर परतवाडाच्या घरोघरी रुग्ण आढळत असल्याने एकच खळबळ उडाली आहे. आरोग्य यंत्रणा खळबळून कामाला लागली असून खबरदारी घेण्याचे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आली आहे.

कोकाटेंचं मंत्रिपद गेलं, राजीनामा मंजूर, अटकेसाठी पोलीस 3 तास लिलावतीत
कोकाटेंचं मंत्रिपद गेलं, राजीनामा मंजूर, अटकेसाठी पोलीस 3 तास लिलावतीत.
एपस्टिन कांडामुळं भारतात राजकीय उलथापालथ होणार,सामनातून सरकारवर निशाणा
एपस्टिन कांडामुळं भारतात राजकीय उलथापालथ होणार,सामनातून सरकारवर निशाणा.
...तर बीडमध्ये उपोषण करणार, सुप्रिया सुळे यांनी का दिला टोकाचा इशारा?
...तर बीडमध्ये उपोषण करणार, सुप्रिया सुळे यांनी का दिला टोकाचा इशारा?.
प्रज्ञा सातव भाजपवासी, एकाच प्रवेशात BJP कडून 2 शिकार?
प्रज्ञा सातव भाजपवासी, एकाच प्रवेशात BJP कडून 2 शिकार?.
पुणे निवडणुकीसाठी धंगेकरांना ठेवलं दूर, BJPच्या बैठकीत बोलवलंच नाही!
पुणे निवडणुकीसाठी धंगेकरांना ठेवलं दूर, BJPच्या बैठकीत बोलवलंच नाही!.
निवडणुकीत दोन्ही NCPच्या एकत्र येण्यास ठाकरेंचा विरोध, 'मविआ'त ठिणगी
निवडणुकीत दोन्ही NCPच्या एकत्र येण्यास ठाकरेंचा विरोध, 'मविआ'त ठिणगी.
दादांनंतर शिंदे आमदारामागे कोर्ट कचेरी, कोकाटेंनंतर कुडाळकर गोत्यात!
दादांनंतर शिंदे आमदारामागे कोर्ट कचेरी, कोकाटेंनंतर कुडाळकर गोत्यात!.
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.