होय राधाकृष्ण विखे पाटील यांनी मला फोन केला, पण त्यापलीकडे आमच्यात काहीच.. नीला विखे यांचा धक्कादायक खुलासा..

राधाकृष्ण विखे पाटील हे राज्यातील राजकारणातील मोठे नाव आहे. राधाकृष्ण विखेंची पुतणी थेट स्वीडनमध्ये खासदार झाली. ज्यानंतर नीला यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. यानंतर नीला यांनी गंभीर आरोप केले.

होय राधाकृष्ण विखे पाटील यांनी मला फोन केला, पण त्यापलीकडे आमच्यात काहीच.. नीला विखे यांचा धक्कादायक खुलासा..
Nila Vikhe Patil Radhakrishna Vikhe Patil
| Updated on: Sep 26, 2026 | 10:14 AM

विखे पाटील कुटुंब राज्यातील बडे घराणे आहे. यासोबतच साखर कारखाने आणि शैक्षणिक क्षेत्रात विखे कुटुंब आघाडीवर आहे. मात्र, आता विखे कुटुंबातील वाद पुढे आला. राधाकृष्ण विखे पाटील यांची पुतनी स्वीडनमध्ये खासदार म्हणून निवडून आली. तिथेच हा वाद पुढे आला. राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुतनी नीला विखे ही 349 सदस्य असलेल्या संसदेत खासदार म्हणून निवडून गेली. 41 व्या वर्षी नीला यांनी ही झेप घेतल्याने काैतुकांचा वर्षा झाला. स्वत: राधाकृष्ण विखे पाटील यांनी नीला यांना फोन करून शुभेच्छा दिल्या. मात्र, नीला यांचा चुलत भाऊ अर्थात सुजन विखे यांनी म्हटले की, ही तिचा पक्ष जर भारतात असतात तर ती निवडून येऊ शकली नसती. यानंतर आता नीला विखे पाटील यांनी एक मुलाखत दिली आणि सर्व काही सांगितले.

राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुतनी स्वीडनमध्ये खासदार म्हणून निवडून आल्यानंतर आनंद व्यक्त करताना दिसले. मात्र, हे श्रेय घेत असल्याचे नीला विखे यांनी म्हटले. यासोबतच मोठा खुलासा करत त्यांनी म्हटले की, माझे काका आणि चुलत भाऊ यांना मी गेल्या 10 ते 12 वर्षात बोलले नाही. आमच्यात साधा संवादही कधी होत नाही. त्यातच सुजय म्हणतो की, भारतात तिचा पक्ष असता तर ती निवडून येऊ शकली नसती.

पण मी त्यांच्यासारखे वारंवार पक्ष बदलत नाही. मी माझ्या पक्षासोबत प्रामाणिक आहे आणि शेवटपर्यंत मी माझ्या पक्षाला बांधिल राहिल. यादरम्यानच नीला विखे यांनी म्हटले की, मी खासदार म्हणून निवडून आल्यानंतर मला काकांचा फोन आला होता. त्यांनी मला शुभेच्छा दिल्या… त्या पलिकडे काहीच नाही, ही वस्तूस्थिती आहे.

विखे कुटुंबातील वाद या माध्यमातून पुढे आला. यासोबतच त्यांनी म्हटले की, मी भारतात कायमच येत असते. पण मी यापैकी कोणालाही भेटत नाही. शिक्षणतज्ज्ञ अशोक विखे पाटील यांची कन्या नीला विखे आहेत. अशोक विखे हे राधाकृष्ण विखे पाटील यांचे मोठे बंधू आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us