AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vikhe Patil : स्वीडनच्या खासदार नीला विखे यांचे राधाकृष्ण विखे पाटलांबद्दल मोठे खुलासे, विखे कुटुंबात नक्की वाद काय…

Nila Ashok Vikhe Patil Member of Parliament in Sweden : राधाकृष्ण विखे पाटील यांची पुतणी थेट स्वीडनमध्ये खासदार झाली. त्यानंतर शुभेच्छांचा वर्षाव झाला. अहिल्यानगरची लेकीने स्वीडनमध्ये डंका मारली. राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुतनीचे काैतुक केले. पण त्यानंतर नीला यांनी धक्कादायक खुलासे केले.

Vikhe Patil : स्वीडनच्या खासदार नीला विखे यांचे राधाकृष्ण विखे पाटलांबद्दल मोठे खुलासे, विखे कुटुंबात नक्की वाद काय...
Nila Vikhe Patil and Radhakrishna Vikhe Patil
| Updated on: Sep 25, 2026 | 2:54 PM
Share

राज्यातील राजकारणात बडे नाव, शैक्षणिक क्षेत्रात विखे पाटील यांचे कुटुंबिय आघाडीवर आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात विखेचे वर्चस्व बघायला मिळते. त्यातच विखे घराण्याच्या लेकीने थेट स्वीडनमध्ये धमाका केला. अहिल्यानगरच्या लेकीची थेट स्वीडनच्या डंका बघायला मिळाली. 41 वर्षीय नीला विखे पाटील स्वीडनमध्ये खासदार झाल्या आहेत. 349 सदस्य असलेल्या संसदेत त्या सदस्य म्हणून पोहोचल्या. स्टॉकहोम शहर मतदारसंघातून त्यांनी नुकतीच निवडणूक जिंकली आणि त्या स्वीडनमध्ये खासदार झाल्या.नीला विखे पाटील या राधाकृष्ण विखे यांच्या मोठ्या भावाच्या कन्या आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांपासून त्यांचा कधी साधा संपर्कही नव्हता. कधी एकमेकांसोबत ते संवादही साधत नाही. 12 वर्षापेक्षाही अधिक काळापासून आपला काहीच संपर्क नसल्याचा मोठा खुलासा नीला विखे यांनी केला. काका राधाकृष्ण विखे आणि चुलत भाऊ सुजय विखे यांच्यासोबत काहीच नाते नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मी निवडून आल्यानंतर नक्कीच मला काकांचा फोन आलेला. पण राजकीय किंवा काैटुंबिक संबंध आमच्या नक्कीच नसल्याचे नीला यांनी एका मुलाखतीमध्ये बोलताना स्पष्ट केले. त्यातच आता विखे कुटुंबाबद्दल मोठी माहिती पुढे येतंय. अशोक विखे यांनी राधाकृष्ण विखेंवर आत्तापर्यंत अनेक आरोप केले. संस्थांचे नियंत्रण, राजकीय हस्तक्षेप आणि आर्थिक गैरव्यवहार या मुद्द्यांवर त्यांनी गंभीर आरोप केले.

प्रवरा शैक्षणिक संस्थांवर राधाकृष्ण विखे यांनी बेकायदेशीरपणे नियंत्रण मिळवल्याचा अशोक विखेंचा आरोप आहे. संस्थांचा वापर राजकीय स्वार्थासाठी केला जात असल्याचा दावा यादरम्यान त्यांनी केला. संस्थेच्या कारभारात आपल्याला डावलण्यात आल्याचा आरोप देखील त्यांचा आहे. मुळा-प्रवरा वीज संस्थेत कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. या गैरव्यवहारात राधाकृष्ण विखेंच्या भूमिकेवर अशोक विखेंनी प्रश्न उपस्थित केले.

विखे कुटुंबाच्या संस्थांवर एकाधिकार निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. साखर कारखान्यांकडून ऊस उत्पादकांना FRPची पूर्ण रक्कम न दिल्याचा आरोप आहे. प्रवरा संस्थेतील कर्मचाऱ्यांचा राजकीय प्रचारासाठी वापर केल्याचा दावा आहे. झाकीर नाईक यांच्या संस्थेकडून विखे संस्थेला देणगी मिळाल्याचा मुद्दा उपस्थित करत अशोक विखेंनी प्रश्न उपस्थित केले. सुजय विखे हे पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक लढवली त्यावेळेला थेट त्यांच्या विरोधात प्रचार करण्यासाठी ते शरद पवार यांच्या मंचावर उपस्थित होते.

Follow Us
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी
93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा... लालबागच्या राजाची मिरवणूक
Lalbaugcha Raja : 93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा अन्... लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बघाच
घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
Latur Drought : घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
Lalbaugcha Raja : शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
Chinchpokli Chintamani : ढोल-ताशांच्या गजरात चिमुकला थिरकला! चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा... फडणवीसांचा तो डायलॉग
Devendra Fadnavis : मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा मी येतोच! फडणवीसांचा तो जुना डायलॉग पुन्हा चर्चेत
धान्य, फळं अन्… देखाव्यातून शेतकऱ्यांची व्यथा! केसरीवाडा गणपतीने....
Pune Ganpati Visarjan : धान्य, फळं अन् उसाची शेती… देखाव्यातून शेतकऱ्यांची व्यथा! केसरीवाडा गणपतीने वेधलं पुणेकरांचं लक्ष
ढोल-ताशांचा गजर अन् मोरयाच्या जयघोषात लालबागचा राजा मार्गस्थ
Lalbaugcha Raja : बाप्पाला निरोप देण्यासाठी कोळी बांधवांचा जल्लोष! पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांचा गजर अन् मोरयाच्या जयघोषात लालबागचा राजा मार्गस्थ
मुंबईच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक; तरुणांचा मोठा समावेश, व्हिडिओ..
Mumbaicha Raja Visarjan : मुंबईच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक; तरुणांचा मोठा समावेश, व्हिडिओ व्हायरल
ज्योतिबाच्या अवतारातील राजा तेजुकाया गणपतीवर पुष्पवृष्टी करत...
Ganpati Visarjan 2026 : ज्योतिबाच्या अवतारातील राजा तेजुकाया गणपतीवर पुष्पवृष्टी करत मुंबईकरांची मानवंदना