AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

त्या प्रकरणात निलेश राणेंना मोठा धक्का, अडचणी वाढल्या

काही दिवसांपूर्वी शिवसेना शिंदे गटाचे नेते निलेश राणे यांनी भाजपच्या एका कार्यकर्त्य्याच्या घरावर छापा टाकून मतदारांना पैसे वाटप सुरू असल्याचा आरोप केला होता, या प्रकरणात आता निवडणूक आयोगाची भूमिका समोर आली आहे.

त्या प्रकरणात निलेश राणेंना मोठा धक्का, अडचणी वाढल्या
निलेश राणे Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Dec 01, 2025 | 8:21 PM
Share

राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांची रणधुमाळी सुरू आहे,  मात्र यावेळी महाविकास आघाडी आणि महायुती असा थेट सामना या निवडणुकीमध्ये दिसून येत नाहीये, तर अनेक ठिकाणी महायुतीमधीलच घटक पक्ष एकमेकांविरोधात उभे राहिले असल्याचं चित्र आहे. सिंधुदुर्गमध्ये देखील असचं चित्र आहे. निलेश राणे यांनी भाजप कार्यकर्त्याच्या घरावर टाकलेल्या छाप्यानंतर भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील संघर्ष आणखी वाढल्याचं पहायला मिळालं होतं. दरम्यान या प्रकरणात निलेश राणे यांच्यावर गुन्हा देखील दाखल झाला आहे. आता या प्रकरणात निवडणूक आयोगाची भूमिका समोर आली आहे, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार  कुणाच्याही घरात जाऊन फेसबुक लाईव्ह करणं, नियमात बसत नसल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. त्यामुळे आता निलेश राणे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

निवडणूक आयोगानं काय म्हटलं? 

काही दिवसांपूर्वी शिवसेना शिंदे गटाचे नेते निलेश राणे यांनी भाजपच्या एका कार्यकर्त्याच्या घरावर छापा टाकला होता. यावेळी भाजपकडून मतदानारांना पैसे वाटप होत असल्याचा दावा त्यांनी केला होता, या भाजप कार्यकर्त्याच्या घरातून त्यांनी फेसबुक लाईव्ह देखील केलं होतं. त्यानंतर भाजपकडून निलेश राणे यांचे सर्व आरोप फेटाळून लावण्यात आले होते, दरम्यान या प्रकरणी निलेश राणे यांच्याविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. यावर आता निवडणूक आयोगाची भूमिका समोर आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कुणाच्याही घरात जाऊन फेसबुक लाईव्ह करणं, हे नियमात बसत नसल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. तसेच  सार्वजनिक ठिकाणी पैसे वाटप होत असल्यास तात्काळ कारवाई संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देखील देण्यात आल्या आहेत.

काय आहे नेमकं प्रकरण? 

काही दिवसांपूर्वी निलेश राणे यांनी भाजपच्या एका कार्यकर्त्याच्या घरावर छापा टाकला होता, तिथे आपल्याला पैसे मिळून आल्याचा दावा देखील त्यांनी केला होता, तसेच त्यांनी याचं फेसबुक लाईव्ह देखील केलं होतं. मतदारांना पैशांचं वाटप होत असल्याचा आरोप त्यांनी केला होता, यावरून भाजप आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष चांगलाच वाढल्याचं पहायला मिळालं.

Follow Us
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य
मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
Manoj Jarange Hunger Strike | मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर