लाडकी बहीण योजनेवर आमदार निरंजन डावखरेंचं मोठं विधान, म्हणाले…

लाडकी बहीण योजनेवर आमदार निरंजन डावखरेंचं मोठं विधान केलं आहे. यावेळी डावखरे यांनी विरोधकांच्या आरोपांना देखील उत्तर दिलं.

लाडकी बहीण योजनेवर आमदार निरंजन डावखरेंचं मोठं विधान, म्हणाले...
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 22, 2026 | 1:51 PM

राज्यातील शेतकऱ्यांना दुष्काळाची झळ सहन करावी लागत आहे. ऐन दुष्काळात शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत केली जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. या दुष्काळग्रस्त स्थितीत लाडकी बहीण योजनेचा बोजा अर्थव्यवस्थेवर पडत असल्याचा दावा विरोधकांकडून केला जात आहे. या लाडकी बहीण योजनेवर आता भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी मोठं विधान केलं आहे.

भाजप आमदार निरंजन डावखरे म्हणाले, ‘तुम्हाला योजनेशी संदर्भातील अधिक माहिती आपल्याला शासनाकडून मिळेलच. मात्र, लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर काही बोजा पडत असेल, असं मला वाटत नाही. त्याचं नियोजन करण्यासाठी राज्य शासन निश्चितपणे सक्षम आहे. अर्थखातं आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडे आहे. त्यामुळे राज्याच्या प्राथमिकता काय आहेत, याची त्यांना निश्चितपणे जाणीव आहे. आज सगळ्यात मोठा प्रश्न हा शेतकऱ्यांचा आहे. राज्यावर दुष्काळाचं जे संकट आहे, त्या पार्श्वभूमीवर शेतकरी हीच शासनाची प्राथमिकता निश्चितपणे राहणार आहे’.

Loading...

सोन्याच्या कोसळणाऱ्या दरावर डावखरे म्हणाले, ‘मुळात आपण बघितलं, तर मोदीजींनी यापूर्वीही परदेश दौरे टाळावेत आणि त्याचबरोबर सोने खरेदीच्या बाबतीतही थोडेसे निर्बंध पाळावेत, अशा संदर्भातील सूचना देशाचे प्रमुख म्हणून निश्चितपणे दिल्या होत्या. त्या सूचना जनहितार्थ निश्चितपणे होत्या आणि आहेत, हे आपण सातत्याने बघितलं आहे. आपल्या देशाची स्वतःची अर्थव्यवस्था वाढली पाहिजे, या दृष्टिकोनातून त्यावेळी मोदीजींचं ते म्हणणं होतं, असं मला वाटतं. आता सोन्याच्या भावात झालेली घसरण ही जागतिक स्तरावरची आहे.त्यामुळे यामागची जी काही आर्थिक कारणं आहेत, त्यांची चौकशी आणि माहिती आपण सगळेच घेत आहोत’.

आमदार रोहित पवार यांच्या मफलरमॅन आरोपावर डावखरे म्हणाले, ‘मुळात रोहित पवार यांचं असं झालं आहे की, ते प्रसिद्धीसाठी एका अतिशय वैफल्यग्रस्त परिस्थितीतून वेगवेगळे स्टंट करत आहेत. स्वतःला प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी अशा प्रकारचे स्टंट करणं, ही त्यांच्या दृष्टिकोनातून शोकांतिका आहे. आपण एक आमदार आहोत आणि जबाबदार आमदार म्हणून लोकांना काय माहिती देत आहोत, तसेच किती चुकीची माहिती देत आहोत, याचाही त्यांनी विचार केला पाहिजे. स्वतः VSR च्या विमानामधून ते फिरतात. त्यांचे अनेक व्हिडिओ आपण सगळ्यांनी चॅनलवर पाहिलेले आहेत आणि ते सोशल मीडियावरही फिरत आहेत. स्वतः विमानातून फिरतात, मग त्यांचे काही संबंध आहेत का, याबाबत त्यांनी स्पष्टपणे माहिती दिली पाहिजे’.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us