राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवती प्रदेशाध्यक्षपदी निर्मला नवले यांची निवड, झेडपीत झाला होता पराभव…

माजी सरपंच निर्मला नवले यांची निवड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवती प्रदेशाध्यक्षपदी करण्यात आली आहे. निर्मला नवले यांचा जिल्हा परिषद निवडणुकीत नुकताच पराभव झाला होता.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवती प्रदेशाध्यक्षपदी निर्मला नवले यांची निवड, झेडपीत झाला होता पराभव...
Nirmala Navale
| Updated on: Aug 06, 2026 | 6:44 PM

निर्मला नवले यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवती प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. निर्मला नवले यांचा जिल्हा परिषद निवडणुकीत पराभव झाला होता. कारेगावच्या माजी सरपंच असलेल्या निर्मला नवले या सोशल मीडियावर सक्रीय असतात. त्यांना प्रचंड फॉलोअर देखील आहेत. निर्मला नवले यांना राष्ट्रवादी अजितदादा यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तिकीट दिले होते. भाजपाच्या मनीषा पाचंगे यांनी निर्मला नवले यांचा पराभव केला होता.

निर्मला नवले यांची प्रतिक्रीया…

राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी माझी निवड झाली आहे.  महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा अजितदादा पवार यांच्या हस्ते मला आज त्याचे नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले आहे. स्व.अजितदादांनी आपल्या कार्यावर विश्वास ठेवून कार्याध्यक्षपदाची जबाबदारी मला दिली होती. आज त्याच विश्वासाला पुढे नेत माझ्यावर संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली, हा अत्यंत भावनिक आणि अभिमानाचा क्षण आहे असे सोशल मीडियावर निर्मला नवले यांनी लिहिले आहे.

शिरूरमधल्या कारेगांवमधून संधी

राज्यामध्ये नुकत्याच 12 जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत 125 पंचायत समितीसाठीच्या निवडणुका झाल्या होत्या. त्यात शिरूर पंचायत समितीचाही समावेश होता. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने कारेगाव गणातून निर्मला नवले यांना उमेदवारी दिली होती. भाजपच्या मनीषा पाचंगे यांनी या निवडणूकीत निर्मला नवले यांचा 2700 मतांनी पराभव केला होता.

कोण आहेत निर्मला नवले ?

निर्मला नवले या माजी सरपंच आहेत, त्यांचे सोशल मीडियावर 5 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्या सोशल मीडियावर नेहमी वेगवेगळे व्हिडीओ पोस्ट करीत असतात. त्यांचा त्यांच्या पतीने रेज रोव्हर गिफ्ट दिल्यानंतर आनंद व्यक्त करणारा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. आयटी इंजीनिअर असलेल्या निर्मला नवले या सरपंच म्हणून निवडून आल्यानंतर त्यांचे ‘उच्चशिक्षित सरपंच’ असे कौतुक केले जात होते.

येथे पोस्ट वाचा…

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us