उद्धव ठाकरे यांचं राजकीय धर्मांतर झालं, आता… नितेश राणे यांचा खोचक टोला

भाजपचे आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांचं राजकीय धर्मांतर झालं आहे असा आरोप नितेश राणेंनी केला आहे.

उद्धव ठाकरे यांचं राजकीय धर्मांतर झालं, आता... नितेश राणे यांचा खोचक टोला
Rane vs Thackeray
| Updated on: Aug 24, 2025 | 3:08 PM

भाजपचे आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांचं राजकीय धर्मांतर झालं आहे असा आरोप नितेश राणेंनी केला आहे. तसेच उद्धव ठाकरेंनी मुंबई महापालिका लुटली असंही नितेश राणे यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर त्यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याबाबतही भाष्य केलं आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

उद्धव ठाकरेंनी महापालिका लुटली – राणे

नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केला आहे. राणे म्हणाले की, ‘मुंबई महापालिकेवर मोर्चा काढण्यापेक्षा मातोश्रीवर काढावा, त्यांची मर्सडीज, त्यांचे कपडे, एसी हे पालिकेच्या पैशाच्या माध्यमातून त्यांनी विकत घेतले आहे. मुघलांनी ज्याप्रमाणे भारत लुटण्यासाठी कटकारस्थान केले त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी पालिका लुटण्यासाठी कटकारस्थान केले असं राणे यांनी म्हटलं आहे.

उद्धव ठाकरेंच राजकीय धर्मांतर झालं आहे – राणे

राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना गणेशोत्सवासाठी आमंत्रण दिले आहे. यावर बोलताना नितेश राणे म्हणाले की, ‘कोणाला बोलवावं किंवा नाही बोलावावं हा त्यांचा घरातला विषय आहे. राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना बोलावलं चांगली गोष्ट आहे. देवेंद्र फडणीसांपासून सगळ्यांकडे ते जातात. महाराष्ट्राची संस्कृती यालाच म्हणतात. आम्ही सगळेच एकमेकांसोबत नातेसंबंध ठेवून आहोत. दोन भाऊ वाद मिटून एकमेकांच्या घरात जात असतील तर काही वाद नाही. मात्र उद्धव ठाकरेंच राजकीय धर्मांतर झालं आहे, तरी त्यांना राज ठाकरे यांच घरी गणपतीसाठी जाण्यासाठी संधी मिळत असेल तर ही चांगली बाब आहे.

आमच्यासाठी मतचोरी म्हणजे…

मतचोरीवर बोलताना नितेश राणे म्हणाले की, आज सकाळी आम्ही मोदी एक्सप्रेसमध्ये मतांची चोरी केली. आमच्यासाठी मतांची चोरी म्हणजे लोकांची मन जिंकणं. प्रत्येक जण जो आज मोदी एक्सप्रेसने गेला आहे त्याने भाजपला मतदान करण्याचा मनात निश्चित केला आहे. लोकांची मदत केली तर लोक ईव्हीएम मध्ये मतं टाकतात त्यासाठी घरात बसून ओरडायची गरज लागत नाही असंही राणे यांनी म्हटलं आहे.