AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik Election Results 2026 LIVE: नाशिकच्या प्रभाग क्रमांक 11 व 12 मध्ये कुणाची सरशी? वाचा…

Nashik Municipal Corporation NMC Ward 11 and 12 Election Results 2026 LIVE Updates in Marathi : नाशिकमधील प्रभाग क्रमांक 11 आणि 12 वर भाजपसह मनसे आणि काँग्रेसचे वर्चस्व आहे. त्यामुळे या प्रभागाकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Nashik Election Results 2026 LIVE: नाशिकच्या प्रभाग क्रमांक 11 व 12 मध्ये कुणाची सरशी? वाचा...
Nashik 11 and 12Image Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Jan 16, 2026 | 1:00 AM
Share

नाशिक महानगरपालिका निवडणूक 2026 चा सविस्तर कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने 15 डिसेंबर 2025 रोजी जाहीर केला आहे. या घोषणेनुसार, नाशिकसह राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडणार आहेत. मतदान 15 जानेवारी 2026 रोजी पार पडेल आणि मतमोजणी होऊन 16 जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे. नाशिकमधील प्रभाग क्रमांक 11 आणि 12 मध्ये कोणता भाग आहे? लोकसंख्या किती आहे? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

प्रभाग क्रमांक 11 (सातपूर विभाग – शिवाजी नगर / श्रमिक नगर)

नाशिकमधील प्रभाग क्रमांक 11 हा प्रामुख्याने सातपूर या औद्योगिक विभागाचा भाग आहे. या प्रभागाचा विस्तार सातपूर कॉलनी, शिवाजी नगर, श्रमिक नगर आणि ध्रुव नगर या परिसरापर्यंत पसरलेला आहे. 2011 च्या जनगणनेनुसार आणि 2017 च्या प्रभाग रचनेनुसार, या प्रभागाची अंदाजे लोकसंख्या 38,000 ते 42000 च्या दरम्यान आहे. हा प्रभाग प्रामुख्याने ‘कामगार वस्ती’ म्हणून ओळखला जातो, कारण येथील लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर सातपूर औद्योगिक वसाहतीतील (MIDC) कारखान्यांवर अवलंबून आहे. या प्रभागातून रिपाईच्या दिक्षा लोंढे, मनसेचे योगेश शेवरे, सलीम शेख आणि शिवसेनेच्या सीमा निगळ यांनी विजय मिळवला होता.

प्रभाग क्रमांक 12 (सातपूर – अशोक नगर / सातपूर गावठाण)

प्रभाग क्रमांक 12 मध्ये अशोक नगर, सातपूर गावठाण, कार्बन नाका आणि सातपूर कॉलनीचा उर्वरित भाग येतो. या प्रभागाची लोकसंख्या अंदाजे 40000 ते 45000 च्या आसपास आहे. हा परिसर नाशिकमधील सर्वात दाट लोकवस्तीच्या भागांपैकी एक आहे. या प्रभागाचा विस्तार त्र्यंबक रोडला लागून असलेल्या वसाहतींपासून ते अंबड लिंक रोडच्या काही भागापर्यंत पसरलेला आहे. या प्रभागाचा विकास प्रामुख्याने रस्ते आणि सांडपाणी व्यवस्थापनाच्या समस्यांभोवती फिरत असतो. 2017 साली या प्रभागातून भाजपच्या प्रियंका घाटे आणि शिवाजी गांगुर्ड तसेत काँग्रेसच्या समीर काबळे आणि हेमलता पाटील यांनी विजय मिळवला होता.

महाराष्ट्र निवडणूक निकाल 2026

महाराष्ट्र महापालिका निवडणूक निकाल 2026 मतमोजणीचे लाईव्ह अपडेट्स

बीएमसी महाराष्ट्र निवडणूक निकाल LIVE TV

महाराष्ट्र महानगरपालिकेचा सर्वात वेगवान निकाल पाहा फक्त टीव्ही 9 मराठीवर LIVE

नाशिक महापालिका निवडणूक निकाल 2026 LIVE

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...