AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik Election Results 2026 LIVE: नाशिकमध्ये भाजपला दणका, एकाच प्रभागात काँग्रेसचे 3 उमेदवार विजयी

Nashik Municipal Corporation NMC Ward 13 and 14 Election Results 2026 LIVE Updates in Marathi : नाशिकमधील प्रभाग क्रमांक 13 आणि 14 वर राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. गेल्या निवडणूकीत या दोन्ही प्रभागातील 4 जागांवर राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी विजय मिळवला होता.

Nashik Election Results 2026 LIVE:  नाशिकमध्ये भाजपला दणका, एकाच प्रभागात काँग्रेसचे 3 उमेदवार विजयी
Nashik 13 and 14Image Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Jan 16, 2026 | 3:28 PM
Share

नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया 15 जानेवारी 2026 रोजी पार पडली होती. आज 16 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून सुरू झाली आहे. त्यामुळे नाशिकसह राज्यातील जनतेचे या निकालाकडे लक्ष लागलेले आहे. नाशिक महानगरपालिकेच्या आगामी 2026 च्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 13 आणि 14 मधील निकालावर सर्वांचे लक्ष असणार आहे. या प्रभागांमध्ये काय परिस्थिती आहे ते जाणून घेऊयात.

प्रभाग 14 मध्ये काँग्रेसचं वर्चस्व

प्रभाग 14 मध्ये काँग्रेसचे 3 तर एक अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा एक उमेदवार विजयी झाला आहे. प्रभाग 14 मध्ये भाजपकडून उमेदवार न दिल्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला फायदा झाला आहे. या प्रभागातून काँग्रेसच्या नाझीया अत्तार, सामीया खान, सुफी जीन आणि अजित पवार राष्ट्रवादीचे जागृती गांगुर्डे विजयी झाल्या  आहेत.

प्रभाग क्रमांक 13 (सिडको – उत्तम नगर / अंबड परिसर)

प्रभाग क्रमांक 13 हा प्रामुख्याने सिडको (CIDCO) आणि अंबड विभागाचा भाग आहे. या प्रभागाचा विस्तार उत्तम नगर, पवन नगरचा काही भाग, अंबड गावठाण आणि माऊली नगर या परिसरापर्यंत पसरलेला आहे. 2011 च्या जनगणनेनुसार, या प्रभागाची अंदाजे लोकसंख्या 37000 ते 41000 च्या दरम्यान आहे. हा प्रभाग मध्यमवर्गीय आणि कामगार वर्गाचे प्राबल्य असलेला भाग म्हणून ओळखला जातो. 2017 च्या निवडणुकीत या प्रभागातून गजानन शेलार (राष्ट्रवादी) वत्सला खैरे (काँग्रेस) शाहू खैरे (काँग्रेस) सुरेखा भोसले (मनसे) यांनी विजय मिळवला होता.

प्रभाग क्रमांक 14 (सिडको – पवन नगर / सावता नगर)

प्रभाग क्रमांक 14 मध्ये पवन नगर, सावता नगर, सिडको बस डेपो परिसर आणि लेकनगरचा काही भाग समाविष्ट होतो. या प्रभागाची लोकसंख्या अंदाजे 39000 ते 43000 च्या आसपास आहे. हा परिसर नाशिकमधील सर्वात नियोजित आणि गजबजलेल्या निवासी क्षेत्रांपैकी एक आहे. या प्रभागाचा विस्तार सिडकोच्या प्रमुख चौकांपासून ते अंबड लिंक रोडच्या काही भागापर्यंत आहे. या प्रभागात मोठ्या प्रमाणावर उद्याने आणि बाजारपेठांचे जाळे असून नागरी सुविधांच्या दृष्टीने हा भाग महत्त्वाचा मानला जातो. 2017 च्या निवडणुकीत या प्रभागातून शोभा साबळे (राष्ट्रवादी) समिना मेमन (राष्ट्रवादी) मुशिर सय्यद (अपक्ष) सुफी जिम (राष्ट्रवादी) या उमेदवारांनी विजय मिळवला होता. आता 2026 च्या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

महाराष्ट्र निवडणूक निकाल 2026

महाराष्ट्र महापालिका निवडणूक निकाल 2026 मतमोजणीचे लाईव्ह अपडेट्स

बीएमसी महाराष्ट्र निवडणूक निकाल LIVE TV

महाराष्ट्र महानगरपालिकेचा सर्वात वेगवान निकाल पाहा फक्त टीव्ही 9 मराठीवर LIVE

नाशिक महापालिका निवडणूक निकाल 2026 LIVE

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...