AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik Election Results 2026 LIVE: नाशिकच्या प्रभाग क्रमांक 5 आणि 6 मध्ये काय परिस्थिती? भाजपला हा पक्ष टक्कर देणार

Nashik Municipal Corporation NMC Ward 5 and 6 Election Results 2026 LIVE Updates in Marathi : नाशिकमधील प्रभाग क्रमांक 5 आणि 6 वर भाजपचे वर्चस्व आहे. गेल्या निवडणूकीत या दोन्ही प्रभागातील 4 जागांवर भाजपच्या उमेदवारांनी विजय मिळवला होता. तर मनसे आणि अपक्ष उमेदवारही विजयी झाले होते. त्यामुळे आता या भागात सत्ता टिकवण्याचे आव्हान भाजपसमोर असणार आहे.

Nashik Election Results 2026 LIVE: नाशिकच्या प्रभाग क्रमांक 5 आणि 6 मध्ये काय परिस्थिती? भाजपला हा पक्ष टक्कर देणार
nashik prabhag 5 and 6Image Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Jan 16, 2026 | 12:58 AM
Share

नाशिक महानगरपालिका निवडणूक 2026 चा सविस्तर कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने 15 डिसेंबर 2025 रोजी जाहीर केला होता. या घोषणेनुसार मतदान 15 जानेवारी 2026 रोजी पार पडले असून आज 16 जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे. नाशिकमधील प्रभाग क्रमांक 5 आणि 6 ची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

प्रभाग क्रमांक 5 (पंचवटी परिसर)

नाशिक महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक 5 हा प्रामुख्याने पंचवटी विभागांतर्गत येतो. या प्रभागाचा विस्तार म्हसरूळ, आडगाव शिवारातील काही भाग आणि अमृतधाम परिसरापर्यंत पसरलेला आहे. 2011 च्या जनगणनेवर आधारित आकडेवारीनुसार, या प्रभागाची अंदाजे लोकसंख्या 35,000 ते 40,000 च्या दरम्यान आहे. या प्रभागात चार सदस्य आहेत. 2017 साली या प्रभागातून निवडून आलेले मुख्य उमेदवार कमलेश बोडके (भाजप) नंदिनी बोडके (मनसे) विमल पाटील (अपक्ष) गुरमीत बग्गा (अपक्ष) हे होते. या प्रभागात प्रामुख्याने मध्यमवर्गीय वस्ती आणि झपाट्याने विकसित होणारा निवासी परिसर येतो.

प्रभाग क्रमांक 6 (तपोवन – जनार्दन स्वामी मठ परिसर)

प्रभाग क्रमांक 6 हा देखील पंचवटी विभागाचाच एक भाग असून यात तपोवन, जनार्दन स्वामी मठ परिसर, नांदूर नाका आणि पंचवटीचा काही पूर्व भाग समाविष्ट होतो. या प्रभागाची लोकसंख्या अंदाजे 38000 ते 42000 च्या आसपास आहे. या प्रभागाचा विस्तार गोदावरी नदीच्या काठावरील धार्मिक क्षेत्रापासून ते नवीन नागरी वसाहतींपर्यंत आहे. 2017 च्या निवडणुकीत या प्रभागातून अशोक मुर्तडक (मनसे) आणि भाजपच्या भिकूबाई बागुल, सुनीता पिंगळे, पुंडलीक खोडे यांनी विजय मिळवला होता. हा प्रभाग नाशिकच्या कुंभमेळ्याच्या दृष्टीने आणि धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.

नाशिकमधील प्रभाग क्रमांक 5 आणि 6 मध्ये भाजपसह मनसे आणि अपक्षांचेही वर्चस्व पहायला मिळत आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत जनता कुणाच्या गळ्यात सत्तेची माळ टाकणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

महाराष्ट्र निवडणूक निकाल 2026

महाराष्ट्र महापालिका निवडणूक निकाल 2026 मतमोजणीचे लाईव्ह अपडेट्स

बीएमसी महाराष्ट्र निवडणूक निकाल LIVE TV

महाराष्ट्र महानगरपालिकेचा सर्वात वेगवान निकाल पाहा फक्त टीव्ही 9 मराठीवर LIVE

नाशिक महापालिका निवडणूक निकाल 2026 LIVE

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...