Pooja Chavan suicide | कोणत्याही नेत्याचे कोठेही नाव नाही, भाजपला खोटं बोलायची सवय, नवाब मलिकांकडून राठोड यांचा बचाव

| Updated on: Feb 13, 2021 | 12:35 PM

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात कुठल्याही नेत्याचं कोणीही नाव घेत नाही, असा दावा नवाब मलिक यांनी केला. (Pooja Chavan suicide case )

Pooja Chavan suicide | कोणत्याही नेत्याचे कोठेही नाव नाही, भाजपला खोटं बोलायची सवय, नवाब मलिकांकडून राठोड यांचा बचाव
नवाब मलिक
Follow us on

मुंबई : पूजा चव्हाण (Pooja Chavan) आत्महत्या प्रकरणात महाविकास आघाडी सरकारमध्ये वनमंत्री असलेले संजय राठोड (Sanjay Rathore) यांचे नाव समोर आल्यानंतर राज्यात खळबळ उडाली आहे. राठोड यांचे थेट नाव घेऊन त्यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपकडून केली जात आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारने सावध भूमिका घेतल्याचं दिसतंय. या प्रकरणावर बोलताना “आत्महत्या प्रकरणात कुठल्याही नेत्याचं कोणीही नाव घेत नाही. कोणत्याही नेत्याचा कसलाही संबंध नाही. या प्रकरणात सत्य काय ते चौकशीअंती समोर येईल,” असे म्हणत अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी संजय राठोड यांचा अप्रत्यक्षपणे बचाव केला. तसेच यावेळी बोलताना भाजपला खोटं बोलण्याची सवय आहे. तो त्यांचा धंदा असल्याचे म्हणत त्यांनी भाजपवरही टीका केली. ते मुंबईत ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते. (no one has taken name of Sanjay Rathore in Pooja Chavan suicide case said Nawab Malik)

चिखलफेकीचे प्रकरण बंद करा

“या आत्महत्या प्रकरणात कुठल्याही नेत्याचं कोणीही नाव घेत नाही. कोणत्याही नेत्याचा कसलाही संबंध नाही. या प्रकरणात सत्य काय ते चौकशीअंती समोर येईल. भाजपच्या नेत्यांना खोटं बोलण्याची सवय आहे. हा त्यांचा धंदा आहे. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनीसुद्धा सीडी बाहेर काढणार असल्याचं म्हटलं होतं. पण आम्हाला हे योग्य वाटत नाही. एकमेकांवर चिखलफेकीचे प्रकरण बंद झाले पाहीजे,” असे मलिक म्हणाले.

संजय राठोड यांची हकालपट्टी करा

दरम्यान, पूजा चव्हाणच्या आत्महत्या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांचे नाव आल्यानंतर भाजपने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. संजय राठोड यांचा राजीनामा तत्काळ घेऊन त्यांची हकालपट्टी करा, अशी मागणी भाजप नेते अतुल भातखळकर यांनी केली. तसेच, या प्रकरणात महाविकास आघाडी सरकारकडून आरोपीला पाठिशी घातले जात असल्याचंही त्यांनी म्हटलंय.

कोणत आहेत संजय राठोड?

  • संजय राठोड हे शिवसेनेचे विदर्भातील बडे नेते आहेत
  • शिवसेनेचे नेते संजय राठोड हे पहिल्यांदा 2004 साली यवतमाळमधील दिग्रस विधानसभा मतदार संघातून विजयी झाले.
  • त्यानंतर 2009 आणि 2014 अशा दोन्ही वेळा पुन्हा संजय राठोड आमदार म्हणून विधानसभेत गेले.
  • फडणवीसांच्या 2014 साली राठोड यांच्याकडे यवतमाळच्या सहपालकमंत्रिपदासह महसूल राज्यमंत्रिपदाची धुरा सोपवण्यात आली.
  • 2019 मध्ये जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार आलं तेव्हा, त्यांच्याकडे वने, आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन मंत्रिपदाचा भार सोपवण्यात आला.
  • संजय धुळीचंद राठोड हे महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते आहेत.
  • ते दिग्रस विधानसभा मतदार संघातून 2004 मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले होते.
  • 2009 मध्ये पुन्हा निवडून आले.
  • 2014 मध्ये त्यांची महाराष्ट्राचे राज्यमंत्री म्हणून नियुक्ती झाली. त्यांना महसूल विभाग देण्यात आला.
  • यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांची जबाबदारीदेखील देण्यात आली.
  • 30 डिसेंबर 2019 रोजी त्यांना कॅबिनेट मंत्री करण्यात आले होते.

संबंधित बातम्या :

Pooja Chavan Suicide Case Live Updates : संजय राठोडांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; चित्रा वाघ आक्रमक

पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया, एकनाथ शिंदे म्हणतात…

पूजा चव्हाण आत्महत्या ते भाजपकडून संजय राठोडांचं थेट नाव; आतापर्यंत काय काय घडलं?

(no one has taken name of Sanjay Rathore in Pooja Chavan suicide case said Nawab Malik)