मराठा समाजाच्या तरुणी ओबीसी मंत्र्यांच्या घरात घुसतात, नवनाथ वाघमारे यांचे विधान, थेट वाद..

नवनाथ वाघमारे यांनी नुकताच हैराण करणारे विधान केले. नवनाथ वाघमारे यांनी केलेल्या विधानाने एकच खळबळ उडाली. नवनाथ वाघमारे मराठा समाजाच्या मुलींबद्दल हे विधान केले. ओबीसी मंत्र्यांच्या घरात मराठा समाजाच्या मुली घुसतात, असे त्यांनी म्हटले.

मराठा समाजाच्या तरुणी ओबीसी मंत्र्यांच्या घरात घुसतात, नवनाथ वाघमारे यांचे विधान, थेट वाद..
OBC leader Navnath Waghmare
| Updated on: Aug 17, 2026 | 8:02 AM

ओबीसी समाजाचे नेते नवनाथ वाघमारे यांनी धक्कादायक विधान केले. मराठा समाजाच्या तरूणींबद्दल त्यांनी हे विधान केले. ओबीसी नेत्यांचे गोंडस मुले पाहून मराठा समाजाच्या तरूणी घरात घुसतात. पैसा, गोंडस मुलं त्या बघतात. नवनाथ वाघमारे यांच्या या विधानाने मोठा वाद पेटलाय. नवनाथ वाघमारे यांनी म्हटले की, स्वत: बावनकुळे यांनी सांगितले की, माझी सून मराठा आहे. माझी बायको कुणबी आहे. त्यांच्या घरात सगळे सोयरे घुसले असतील. फक्त बावनकुळे यांच्याच नाही तर अनेक मंत्र्यांच्या घरात मराठ्याच्या मुली घुसल्या आहेत. म्हणजे ओबीसी नेत्यांच्या मंत्र्यांनी गोंडस मुले दिसली, सुंदर मुले दिसली की, मराठ्यांच्या मुली ओबीसी मंत्र्यांच्या घरात घुसतात. मग जर हे मंत्री मराठ्यांच्या मुलीचे ऐकून ओबीसींचे वाटोळे करत असतील तर त्यांनी समोर येऊन सांगावे. आम्हाला ओबीसीची गरज नाही.

नवनाथ वाघमारे यांनी केलेल्या या विधानानंतर अनेक ठिकाणी त्यांच्या विरोधात मराठा समाजाच्या महिला रस्त्यावर उतरल्या आहेत. नवनाथ वाघमारे यांच्याविरोधात निर्देशने केली जात आहेत. हेच नाही तर नवनाथ वाघमारे यांच्या तोंडाला काळे फासणार असल्याचेही अनेकांनी म्हटले. शिवसेना नेत्या रेखा कोंडे यांनी नवनाथ वाघमारे यांना प्रत्युत्तर दिले.

त्यांनी म्हटले की, हा फक्त मराठा नाही तर सर्व महिला वर्गाच्या सन्मानाचा विषय आहे. कोणत्याही समाजातील असो स्रीयांचा अपमान करणं हो खुप मोठा गुन्हा आहे. मराठा समाजातीलच मुली ओबीसी मुलांसोबत लग्न करतात का तर नाही
आता अशी परिस्थिती आहे कि कित्येक ओबीसी समाजातील मुली मराठा समाजातील मुलांसोबर लग्ल करतात.

जातीय राजकारण करण्यासाठी महिलांना टार्गेट करत असाल आणि स्व:ताला महात्मा फुलेंचे वारसा चालवतो असे म्हणतात तर ते बंद आहे. कारण तुम्ही खोट्या आणि तकलादु विचारांवर जगणारी नालायक लोक आहात. नवनाथ वाघमारेंनी मराठा समाजातील महिलांची माफी मागावी.  तुम्ही राजकारणासाठी नेत्यांना टार्गेट करण्यासाठी त्यांच्या घरातल्या महिलांपर्यंत पोहोचता. तुमची राजकिय, सामाजिक पातळी किती खालावली आहे हे दिसते.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us