राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा तडाखा, शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ

राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा तडाखा, शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ
मुंबईसह महाराष्ट्रात तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता

मुंबईत माहिम, प्रभादेवी, सायन, अॅण्टॉप हिलसोबतच घाटकोपर, सांताक्रुझ, वांद्रे या ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पाहायला मिळाल्या. तर काही ठिकाणी रिमझिम पाऊसही पाहायला मिळाला. (Once again unseasonal rains hit the state, raising concerns among farmers)

वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Apr 11, 2021 | 6:15 PM

मुंबई : राज्यात एकीकडे उन्हाचा तडाखा सुरु आहे तर दुसरीकडे अवकाळी पाऊस शेतकऱ्यांचे कंबरडे मोडत आहे. हवामानातील बदलांमुळे ऐन उन्हाळ्यात अवकाळी पाऊस सुरू झाला आहे. हवेच्या दिशेतील बदलामुळे तसेच कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने अवकाळी पाऊस झाल्याचे स्पष्टीकरण हवामान खात्याने दिलं आहे. तसेच पुढील तीन-चार दिवस मुंबईत ढगाळ वातावरण राहील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मुंबईत माहिम, प्रभादेवी, सायन, अॅण्टॉप हिलसोबतच घाटकोपर, सांताक्रुझ, वांद्रे या ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पाहायला मिळाल्या. तर काही ठिकाणी रिमझिम पाऊसही पाहायला मिळाला. (Once again unseasonal rains hit the state, raising concerns among farmers)

गेले दोन-तीन दिवस राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाचं आगमन झालं आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. दोन दिवसांपासून विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गारांसह मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळे अनेक फळबागा आणि कापणीला आलेल्या पिकांचं नुकसान झाल्याचं समोर आलं आहे. महाराष्ट्रात पुढील दोन दिवस राज्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा इशारा पुणे वेधशाळेने दोन दिवसापूर्वी दिला होता. विदर्भात पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. यामुळे शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी, असा सल्ला हवामान विभागाकडून देण्यात आला होता.

परभणीत विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस

पाथरी तालुक्यात रविवारी सकाळपासूनच विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाला सुरूवात झाली. या पावसामुळे शेतशिवारात काढणीला आलेल्या ज्वारी, गहू, हरभरा या पिकांचे नुकसान झाले असून आंबा, चिकू, टरबूज, खरबूज या फळ पिकांचे ही नुकसान झाले आहे.

औरंगाबादमध्ये ढगाळ वातावरण

सकाळी औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यात ढगाळ वातावरण पहायला मिळाले. जिल्ह्याच्या काही परिसरात हलक्या स्वरुपाचा पाऊस पडला. ढगाळ वातावरणामुळे वातावरणात गारवा पसरला होता. ढगाळ वातावरणामुळे उन्हाळी पिकं आणि फळपिकांना धोका निर्माण झाला आहे.

पुण्यात पावसाच्या हलक्या सरी

तर पुण्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण पाहायला मिळत होते. पुण्यात काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. तसेच येत्या चार दिवसात पुण्यात जोरदार पावसाचा इशारा वेधशाळेने वर्तवला आहे.

‘या’ भागात अवकाळी पावसाचा अंदाज

मुंबई, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळ या दरम्यान चक्रीय वाऱ्यांची स्थिती आहे. पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे बंगालच्या उपसागरातून बाष्पाचा पुरवठा होत आहे. त्यामुळे पुढील पाच ते सहा दिवस विदर्भ, मराठवाडा, पश्‍चिम महाराष्ट्र आणि कोकणच्या काही भागात मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार आहे. तर विदर्भात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची अंदाज आहे. (Once again unseasonal rains hit the state, raising concerns among farmers)

इतर बातम्या

Mobile Bonanza Sale : अवघ्या 29 हजारात खरेदी करा लेटेस्ट Iphone

SRH vs KKR IPL 2021, Match Prediction | सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स आमनेसामने, कोण वरचढ ठरणार?

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें