SRH vs KKR IPL 2021, Match Prediction | सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स आमनेसामने, कोण वरचढ ठरणार?

SRH vs KKR IPL 2021 | आयपीएलच्या 14 व्या मोसमातील (ipl) तिसरा सामना सनरायजर्स हैदराबाद (sunrisers hyderabad) विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (kolkata knight riders) यांच्यात खेळवण्यात येणार आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 17:52 PM, 11 Apr 2021
SRH vs KKR IPL 2021, Match Prediction | सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स आमनेसामने, कोण वरचढ ठरणार?
SRH vs KKR IPL 2021 | आयपीएलच्या 14 व्या मोसमातील (ipl) तिसरा सामना सनरायजर्स हैदराबाद (sunrisers hyderabad) विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (kolkata knight riders) यांच्यात खेळवण्यात येणार आहे.

चेन्नई : आयपीएलच्या 14 व्या मोसमातील (IPL 2021) तिसरा सामना आज (11 एप्रिल) खेळवण्यात येणार आहे. हा सामना सनरायजर्स हैदराबाद (sunrisers hyderabad) विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (kolkata knight riders) यांच्यात खेळवला जाणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी चेन्नईतील एम ए चिदंबरंम स्टेडियममध्ये सुरुवात होणार आहे. हैदराबादच्या नेतृत्वाची जबाबदारी डेव्हिड वॉर्नरच्या (David Warner) खांद्यावर आहे. तर कोलकाताचे कर्णधारपद इयोन मॉर्गन (Eoin Morgan) सांभाळणार आहे. 14 व्या हंगामाची सुरुवात विजयाने करण्याचा मानस दोन्ही संघाचा असणार आहे. त्यामुळे कोणता संघ विजय मिळवण्यात यशस्वी ठरणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. (who will win sunrisers hyderabad vs kolkata knight riders ipl match prediction previous match stats in marathi)

कोण वरचढ कोण कमजोर?

आयपीएलमध्ये दोन्ही संघ 19 वेळा एकमेकांसमोर भिडले आहेत. ज्यामध्ये केकेआर भारी राहिली आहे. कोलकात्याने 12 सामने जिंकले आहेत. तर हैदराबादने 7 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.

हैदराबादच्या संघात वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारचं पुनरागमन झालं आहे. गेल्या मोसमात भुवीला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली होती. भुवीने इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत शानदार कामगिरी केली होती. भुवी व्यतिरिक्त राशिद खान, जेसन होल्डर आणि टी नटराजन यांच्या खांद्यावर हैदराबादच्या गोलंदाजीची धुरा असणार आहे. त्यामुळे कोलकातासमोर हैदराबादच्या गोलंदाजांचं आव्हान असणार आहे.

कोलकाताची बॅटिंग

कोलकाताच्या फलंदाजांना गेल्या मोसमापासून संघर्ष करावा लागतोय. कोलकाताचा अष्टपैलू आणि आक्रमक खेळाडू आंद्रे रसेललाही गत मोसमात आपल्या बॅटिंगने चमकदार कामगिरी करता आली नव्हती. कोलकाताच्या बॅटिंगची जबाबदारी कर्णधार इयोन मॉर्नग, शुबमन गिल, आंद्रे रसेल आणि शाकिब अल हसनवर असेल.

बोलिंग साईड

कोलकाताची बोलिंग साईड मजबूत आहे. सुनील नारायण, हरभजन सिंह, शाकिब अल हसन, वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादवसारखे फिरकी गोलंदाज आहेत. त्याशिवाय पॅट कमिन्सही आहे. यामुळे हैदराबादलाही कोलकाताच्या फिरकी गोलंदाजीचा सामना करावा लागणार आहे. यामुळे या दोन्ही संघांपैकी कोणती टीम विजयी सुरुवात करणार, हे पाहण्यासाठी सर्वच उत्सुक आहेत.

सनरायजर्स हैदराबाद : डेव्हिड वार्नर (कर्णधार), अभिषेक शर्मा, बासिल थम्पी, भुवनेश्वर कुमार, जॉनी बेयरस्टो (विकेटकीपर), केन विलियम्सन, मनीष पांडे, मोहम्मद नबी, राशिद खान, संदीप शर्मा, शाहबाज नदीम, श्रीवत्स गोस्वामी, सिद्धार्थ कौल, खलील अहमद, टी. नटराजन, विजय शंकर, रिद्धिमान साहा (विकेटकीपर), अब्दुल समद, जेसन रॉय, जेसन होल्डर, प्रियम गर्ग, विराट सिंह, केदार जाधव, मुजीब उर रहमान आणि जे. सुचित.

कोलकाता नाइट राइडर्स : शुबमन गिल, नितीश राणा, टिम सायफर्ट, राहुल त्रिपाठी, रिंकू सिंह, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), ईयोन मॉर्गन (कर्णधार), आंद्रे रसेल, सुनील नारायण, वरूण सीवी, कुलदीप यादव, पॅट कमिन्स, लॉकी फर्ग्यूसन, कमलेश नागरकोटी, शिवम मावी, संदीप वॉरियर, प्रसिद्ध कृष्णा, शाकीब अल हसन, शेल्डन जॅक्सन, वैभव अरोरा, करूण नायर, हरभजन सिंह, बेन कटिंग, वेंकटेश अय्यर आणि पवन नेगी.

संबंधित बातम्या :

IPL 2021 SRH vs KKR Head To Head Records : आज कोण जिंकणार, कोलकाता की हैदराबाद?, वाचा इतिहासाची पानं…!

IPL 2021 SRH vs KKR live streaming : सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स; सामना कधी, कुठे, केव्हा?

(who will win sunrisers hyderabad vs kolkata knight riders ipl match prediction previous match stats in marathi)