जंगलात दोन वाघांची झुंज, घडला हा भलताच प्रकार, दोघांच्या झुंजीत…

| Updated on: Feb 13, 2022 | 11:06 PM

या वाघासोबत दीड वर्ष वय असलेला या पट्टेदार वाघाची झुंज झाली. या झुंजात एका वाघाचा मृत्यू झालेला आहे. वनविभाग गस्ती करीत असताना ट्रॅप कॅमेऱ्यात मुत्यू पडलेला वाघ आढळला.

जंगलात दोन वाघांची झुंज, घडला हा भलताच प्रकार, दोघांच्या झुंजीत...
झुंजीत एका वााघाचा मृत्यू
Follow us on

गडचिरोली : एकीकडे वाघांची (Tigers Death) संख्या दिवसेदिवस कही होत असताना, गडचिरोलिच्या जगंगलात (Forest) भलताच प्रकार घडला आहे. दोन वाघांची झुंज (Tiger Fight) एका वाघाला चांगलीच महागात पडलीय. जिल्ह्यात दोन वाघांच्या झुंजात एक दीड वर्षीय वाघ ठार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे परिसरातही खळबळ माजली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली वन विभागांतर्गत खंड क्रमांक 12 मध्ये जवळपास सहा महिन्यापासून एक पट्टेदार वाघ वास्तव्यास आहे. या वाघासोबत दीड वर्ष वय असलेला या पट्टेदार वाघाची झुंज झाली. या झुंजात एका वाघाचा मृत्यू झालेला आहे. वनविभाग गस्ती करीत असताना ट्रॅप कॅमेऱ्यात मुत्यू पडलेला वाघ आढळला. या वाघाचे पोस्टमार्टम करून अंतिम दहन करण्यात आले. यावेळी वन विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते.

वाघांची शिकारही वाढली

या वनक्षेत्रामध्ये वाघ, बिबट, अस्वल यासारखे वन्यप्राणी आहेत. या वन्य प्राण्यांपासून शेतीचे पीक वाचविण्यासाठी विजेचा करंटही लावला जातो. मागील सात-आठ वर्षामध्ये जवळपास अनेक वाघांची शिकार झाली आहे. यासह इतरही वन्यप्राण्यांची इथे शिकार केली जाते. देशातील मध्यभागी असलेल्या विदर्भाला वाघाचा कॅरिडॉर समजला जातो. त्यामध्ये पेंच, कोका, नवेगाव-नागझिरा, उमरेड करांडला, ताडोबा, चिखलदरा, तसेच मध्यप्रदेश येथील कान्हा केशरी व बालाघाट हा भाग वनांची आच्छादलेला आहे. वाघ मोठ्या प्रमाणात मायग्रेट होत असतात. मात्र वाघ प्रादेशिक वनात आल्यानंतर त्यासाठी कुठलेही ठोस उपाययोजन वनविभाग करत नाही. त्यामुळे वाघांचे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे, असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.

शिकार करणारी जमात कोणती?

मध्यप्रदेशच्या फासेपारधी समाजाचे लोक बहुतांश वाघाची शिकार करतात. यासाठी स्थानिक लोकांचीही मदत घेतात. तर अस्वल, रानडुक्कर, बिबट्या, हरीण सारख्या प्राण्यांची शिकार स्थानिक लोकच करतात. विशेषता संरक्षित वनक्षेत्राच्या व्यतिरीक्त प्रादेशिक वन क्षेत्रामध्ये या शिकारी मोठ्या प्रमाणात होत असतात. त्यामुळे शासनाने संरक्षित वनक्षेत्राप्रमाणेच असंरक्षित असलेल्या वनक्षेत्र कडेही लक्ष देण्याची गरज असल्याचे मत वन्यजीव प्रेमींनी व्यक्त केला आहे. वाघांच्या संवर्धनासाठी असे सर्व प्रकार टाळण्याची गरज आहे. अन्यथा वाघांची संख्या आणखी कमी होऊ शकते.

मुंबईतील चारकोप तलावात दोन तरुण बुडाले, एकाला सुखरूप बाहेर काढलं, दुसरा…

Wardha Crime : वर्ध्यात दारूच्या नशेतील नोकराला लुटले, 47 लाखाचे दागिने लंपास, अवघ्या काही तासात आरोपी अटक

IPL Auction 2022: कुठल्या संघाकडे किती खेळाडू आणि पर्समध्ये शिल्लक रक्कम किती?