EXCLUSIVE: वर्ध्यातील पुलगाव स्फोटातील केवळ 6 जवानांनाच शहीद दर्जा

वर्धा : पुलगाव येथील केंद्रीय दारुगोळा भंडारात 31 मे 2016 रोजी झालेल्या स्फोटात 19 जवानांना प्राण गमवावे लागले होते. या 19 पैकी केवळ 6 जवानांनाच शहिदाचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे उर्वरित 13 जवानांचे कुटुंबीय शहिदांचा दर्जा मिळावा या मागणीसाठी 25 फेब्रुवारीला दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर उपोषण करणार आहेत. विशेष म्हणजे हे परिवार त्यांना मिळालेले सर्व पुरस्कार, राष्ट्रपती पुरस्कार आणि […]

EXCLUSIVE: वर्ध्यातील पुलगाव स्फोटातील केवळ 6 जवानांनाच शहीद दर्जा
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:25 PM

वर्धा : पुलगाव येथील केंद्रीय दारुगोळा भंडारात 31 मे 2016 रोजी झालेल्या स्फोटात 19 जवानांना प्राण गमवावे लागले होते. या 19 पैकी केवळ 6 जवानांनाच शहिदाचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे उर्वरित 13 जवानांचे कुटुंबीय शहिदांचा दर्जा मिळावा या मागणीसाठी 25 फेब्रुवारीला दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर उपोषण करणार आहेत. विशेष म्हणजे हे परिवार त्यांना मिळालेले सर्व पुरस्कार, राष्ट्रपती पुरस्कार आणि पदक सरकारला परत करणार आहेत.

प्राण गमावलेल्या 19  जवनांपैकी 6 जवनांना सरकारने शहीद घोषित केले, मात्र इतर 13 जवानांना शहिदांचा दर्जा मिळाला नाही.  आग विझविताना ज्या आगीने कवेत घेतले, त्या आगीनेही आग विझविणारा सैनिक आहे  की फायरमन दर्जाचा कर्मचारी आहे हे पाहिलं नाही. मग हे सरकार असं सावत्रपणे का वागतंय असा प्रश्न प्राण गमावलेल्या सैनिकांच्या कुटुंबीयांनी केला आहे .

या 13 जवानांच्या कुटुंबीयांनी अनेकदा पंतप्रधान कार्यालयाला पत्र लिहिले, भेटण्याची वेळ मागितली, विनंत्या केल्या, मात्र काही फायदा झाला नाही.

संमतीशिवाय चिटपाखरुही शिरु न शकणाऱ्या पुलगाव दारुगोळा भंडारात आर्मीचे जवान वेगळे आणि सिविलीयन वेगळे असा फरक केला आहे. प्राण गमावलेल्या  13 फायरमन दर्जाच्या सैनिकांना सिविलीयन म्हणून दर्जा देण्यास नकार दिला असल्याचा आरोप शहिदांच्या कुटुंबियांकडून करण्यात आला आहे.

देशाची सुरक्षा यंत्रणा संभाळतांना सैनिकासोबतच फायरमनची जबाबदारीही तितकीच मोलाची आहे, हे नाकारुन चालणार नाही. ज्या सैन्याला अतिशय महत्वाचा असलेला दारुगोळा लागतो, ती रसद जतन करुन ठेवताना, आग विझवताना, फायरमनची भूमिकाही तितकीच महत्वाची वाटते. आता स्फोटात प्राणाची आहुती देणाऱ्यांना  ‘शहीद’ दर्जा मिळावा यासाठी हे कुटुंबीय पंतप्रधान कार्यालयाशी पत्रव्यवहार करीत आहेत. पण त्याचा काही फायदा होताना दिसत नाही. त्यामुळेच या 13 कुटुंबीयांनी 25 फेब्रुवारी रोजी दिल्लीच्या जंतरमंतरवर उपोषण करण्याची तयारी केली आहे.

2016 च्या पुलगाव बॉम्बस्फोटात शहिदांचा दर्जा न मिळालेले जवान

1) लीलाधर चोपडे , पुलगाव

2) बाळू पाखरे , पुलगाव

3) अमित दांडेकर , पुलगाव

4) अमोल येसनकर , पुलगाव

5) अमित पुनिया , पानिपत, हरियाणा

6) धर्मेंद्रकुमार यादव , उत्तर प्रदेश

7) अरविंद सिंग , हरियाणा

8) कृष्णकुमार ,हरियाणा

9) कुलदीप सिंग ,हरियाणा

10 नवज्योत सिंग , हरियाणा

11) शेखर गंगाधर बाळसकर, आर्वी

12) प्रमोद मेश्राम , यवतमाळ

13) धनराज मेश्राम , नागपूर

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.