ऑपरेशन टायगर अन् मंत्रि‍पदाची चढाओढ… ठाकरेंच्या कोणत्या खासदाराला लागणार लॉटरी? कुठे घोडं अडलं?

Operation Tiger : ऑपरेशन टायगरच्या चर्चेदरम्यान ठाकरे गटातील काही खासदार शिंदे गटात जाण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, फुटणाऱ्या गटाने केंद्रात मंत्रिपदाची मागणी केली असून यावरून खासदारांमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

ऑपरेशन टायगर अन् मंत्रि‍पदाची चढाओढ... ठाकरेंच्या कोणत्या खासदाराला लागणार लॉटरी? कुठे घोडं अडलं?
Uddhav Thackeray Sad
Image Credit source: Google
| Updated on: Jun 16, 2026 | 5:51 PM

राज्यात गेल्या काही काळापासून ऑपरेशन टायगरची चर्चा रंगली आहे. अनेक खासदार हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यावर नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. या नाराजीची माहिती मिळतात उद्धव ठाकरे यांनी खासदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला काही खासदार प्रत्यक्ष हजर होते तर काही खासदार हे ऑनलाईन उपस्थित होते. अशातच आता नाराज खासदार हे एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र यातील काही खासदारांना मंत्रि‍पदाची आशा असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

मंत्रिपदासाठी ऑपरेशन टायगरचं घोडं अडलं?

समोर आलेल्या माहितीनुसार, मंत्रिपदासाठी ऑपरेशन टायगरचं घोडं अडलं असल्याची माहिती समोर आली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेतून फुटणाऱ्या गटाला केंद्रात मंत्रिपद हवं असल्याची माहिती समोर आली आहे. ठाकरेंच्या खासदाराच्या फुटणाऱ्या गटाला मंत्रि‍पदाचा शब्द दिला असल्याचीही माहिती समोर आली आहे. त्यामुळे फुटणाऱ्या गटातील 3-4 खासदार मंत्रि‍पदासाठी उत्सुक असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मंत्रि‍पदासाठी फुटणाऱ्या खासदारांमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचे समोर आले आहे.

6 खासदारांचा गट

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फुटणाऱ्या गटाने केंद्रात एका राज्य मंत्रि‍पदाची मागणी केली आहे. या पदासाठी 3-4 खासदार उत्सुक आहेत. प्रत्येकाला वाटत आहे की मंत्रि‍पदाची माळ आपल्याच गळ्यात पडावी. त्यामुळे खासदारांच्या गटात रस्सीखेच सुरू झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार 6 खासदारांचा गट एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे. या गटाचे नेतृत्व एक वरिष्ठ खासदार करत आहे.

कुणाच्या गळ्यात मंत्रि‍पदाची माळ?

समोर आलेल्या माहितीनुसार शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या या गटाची बैठकीही पार पडली आहे, या बैठकीत मंत्रि‍पदाची मागणी करण्यात आली, त्यानंतर मंत्रिपद देऊ असाही शब्द देण्यात आल्याचे समोर आले आहे. या गटाचे नेतृत्व मराठवाड्यातील एक खासदार करत असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे तो खासदार मंत्रिपदासाठी इच्छुक असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता कोण मंत्री होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us