मोठी बातमी! राज्यात घडामोडींना वेग, विरोधी पक्षाचे खासदार घेणार फडणवीसांची भेट

मोठी बातमी समोर येत आहे, राज्यात घडामोडींना वेग आला आहे. आज विरोधी पक्षाचे खासदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. यामध्ये सुप्रिया सुळे यांचा देखील समावेश आहे.

मोठी बातमी! राज्यात घडामोडींना वेग, विरोधी पक्षाचे खासदार घेणार फडणवीसांची भेट
devendra fadnavis
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 26, 2026 | 11:08 AM

मोठी बातमी समोर येत आहे, राज्यात घडामोडींना वेग आला आहे. आज विरोधी पक्षाचे खासदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. यामध्ये सुप्रिया सुळे यांचा देखील समावेश आहे. आज दुपारी बारा वाजता या खासदारांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक पार पडणार आहे, सह्याद्री अतिथी गृहामध्ये हे सर्व विरोधी पक्षाचे खासदार मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटणार आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार राज्यात असलेल्या विविध प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर हे सर्व खासदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहेत.

विरोधी बाकावर असलेले राज्यातील सर्वच खासदार आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. या सर्व खासदारांची आज दुपारी बारा वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडणार आहे. सह्याद्री अतिथिगृहावर ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीमध्ये विविध मुद्दे चर्चेला येण्याची शक्यता आहे. सध्या राज्यभरात पेपर फुटीचं प्रकरण गाजत आहे. एवढंच नाही तर विद्यार्थ्यांची देखील अनेक ठिकाणी मोठी गैरसोय होत आहे. वेगवेगळे आंदोलन सुरू आहेत, तसेच अनेक प्रकरणात कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. या सर्व मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर आज विरोधी बाकावरील सर्व खासदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. दरम्यान या प्रश्नांशिवाय इतर कोणत्या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा होणार? हे देखील पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Loading...

दरम्यान दुसरीकडे राज्यात जी विकास कामं होत असतात, त्यासाठी लोकप्रतिनिधींना विकास निधीचं वाटप केलं जातं. परंतु त्यामध्ये अनेक ठिकाणी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये भेदभाव होत असल्याचा आरोप देखील होत आहे. या पार्श्वभूमीवर देखील ही बैठक महत्त्वाची असून, या मुद्द्यावर या बैठकीत काही चर्चा होणार का? याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलं आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे या देखील या बैठकीमध्ये सहभागी होणार आहेत. दरम्यान काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सर्व खासदारांनी सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती.

 

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us