Akola Death : अकोल्यात मायलेकींचा दगडपारवा प्रकल्पात बुडून दुर्दैवी मृत्यू

| Updated on: May 02, 2022 | 4:24 PM

दगडपारवा धरणातील मागच्या बाजूला 6 ते 7 फूट पाण्यात मायलेकी बुडाल्या. रात्री दोन मृतदेह वर आले तर एक मृतदेह सकाळी गावकऱ्यांनी बाहेर काढला. सदर घटनेची माहिती पोलिसांना देताच पोलिस घटनास्थळी पोहोचले असून तिघेही मायलेकींचा मृतदेह दगडपारवा प्रकल्पा जवळील कालव्याच्या पाण्यातून काढण्यात आला आहे.

Akola Death : अकोल्यात मायलेकींचा दगडपारवा प्रकल्पात बुडून दुर्दैवी मृत्यू
अकोल्यात मायलेकींचा दगडपारवा प्रकल्पात बुडून दुर्दैवी मृत्यू
Image Credit source: TV9
Follow us on

अकोला : दगडपारवा प्रकल्पाजवळ असलेल्या कालव्यात बुडून (Drowned) तिघी मायलेकींचा दुर्दैवी मृत्यू (Death) झाल्याची घटना अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील दगडपारवा गावात घडली आहे. या घटनेमुळे गावात एकच खळबळ माजली आहे. या तिघी म्हैस शोधण्यासाठी गेल्या असताना पाण्यात पडून मेल्याची प्राथमिक माहिती आहे. सरिता सुरेश घोगरे (42) मयत महिलेचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालय अकोला येथे पाठवण्यात आले. पोलिस पुढील तपास करीत आहेत. गावामध्ये सदर घटनेबद्दल विविध तर्कवितर्क केले जात असून नेमकी ही घटना कशी घडली याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे‌. पोलिस तपासाअंतीच नेमके काय घडले ते स्पष्ट होईल. (A mother and her two daughters drowned in a Dagadparava project in Akola)

म्हैस शोधण्यासाठी गेल्या असता बुडाल्या

बार्शिटाकळी तालुक्यातील दगडपारवा येथे शेतीसाठी जलसिंचन व पाणी टंचाई कालावधीमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होण्याकरीता काटे पूर्णा धरणाला पर्याय म्हणून सदर प्रकल्प निर्माण करण्यात आला आहे. प्रकल्पामध्ये मुबलक प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध असून या ठिकाणी दगडपारवा येथील ग्रामस्थ पाण्याचा उपयोग घेत असतात. रविवारी दगडपारवा येथील आई व दोन मुली या प्रकल्पा लगत असलेल्या कालव्यात म्हैस शोधण्यासाठी गेल्या असता या कालव्यात त्यांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली. या तिघी मायलेकी काल उशिरा सायंकाळपर्यंत घरी न पोहोचल्यामुळे त्यांची शोधाशोध सुरू झाली. त्यानंतर या घटनेचा उलगडा झाला.

दगडपारवा धरणातील मागच्या बाजूला 6 ते 7 फूट पाण्यात मायलेकी बुडाल्या. रात्री दोन मृतदेह वर आले तर एक मृतदेह सकाळी गावकऱ्यांनी बाहेर काढला. सदर घटनेची माहिती पोलिसांना देताच पोलिस घटनास्थळी पोहोचले असून तिघेही मायलेकींचा मृतदेह दगडपारवा प्रकल्पा जवळील कालव्याच्या पाण्यातून काढण्यात आला आहे. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आल्यानंतर तिघी मायलेकींचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालय अकोला येथे पाठवण्यात आला. पुढील तपास पोलिसांनी सुरु केला आहे. (A mother and her two daughters drowned in a Dagadparava project in Akola)

हे सुद्धा वाचा