मुंबईहून ताडोब्यात पर्यटनासाठी आले, परत जाताना कुटुंबीयांना मृतदेह घेऊन जावा लागला, नेमकं काय घडलं?

| Updated on: May 03, 2023 | 6:49 PM

पर्यटकांनी ताडोब्यात गर्दी केली होती. पण, या पर्यटकांच्या आनंदाला तडा जाणारी घटना ताडोब्यात घडली.

मुंबईहून ताडोब्यात पर्यटनासाठी आले, परत जाताना कुटुंबीयांना मृतदेह घेऊन जावा लागला, नेमकं काय घडलं?
Follow us on

चंद्रपूर : ताडोबा आणि वाघ हा संबंध रुढ झाला. ताडोब्याल्या आल्यानंतर हमखास वाघ बघायला मिळतो. त्यासाठी देश-विदेशातून लोकं येतात. ताडोबात वाघ हमखास दिसणार असं पर्यटकांना वाटतं. त्यामुळे या ठिकाण वाघ पाहण्यासाठी येणाऱ्यांची संख्या मोठी असते. त्यात शनिवार, रविवार सुटी असली म्हणजे ताडोबाची बुकिंग फुल्ल असते. त्यात महाराष्ट्र दिनाची सुटी मिळाली. त्यामुळे पर्यटकांनी ताडोब्यात गर्दी केली होती. पण, या पर्यटकांच्या आनंदाला तडा जाणारी घटना ताडोब्यात सोमवारी घडली. मुंबईहून आलेले एक ज्येष्ठ पर्यटक जीवंत पोहचू शकले नाही.

सफारीत बसल्यावर आला ह्रदयविकाराचा झटका

मुंबईतील केशव रामचंद्र बालगी हे ताडोब्यात वाघ बघण्यासाठी आले होते. सफारीत बसल्यानंतर अचानक त्यांच्या छातीत दुखू लागले. टूर गाईड आणि वाहन चालकाने त्यांना रुग्णालयात दाखल केले. पण, तोपर्यंत केशव यांचा मृत्यू झाला होता. ताडोबा प्रशासनाकडून पर्यटकांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यात आले. अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी पी. एल. चव्हाण यांनी दिली.

हे सुद्धा वाचा

केशव बालगी या पर्यटकाचा मृत्यू

ताडोबा सफारी दरम्यान पर्यटकाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. केशव बालगी (वय ७१) असं मृत्यू झालेल्या पर्यटकाचं नाव आहे. मुंबई येथील बालगी कुटुंब ताडोबा कोअरमध्ये सफारीसाठी गेले होते. पण, ही सफारी अधुरी राहिली. प्रकृती बरी वाटत नसल्याने केशव बागली यांनी रुग्णालयात नेण्यात आले. पण, तिथंही त्यांचे प्राण वाचू शकले नाही. बालगी कुटुंबीयांच्याही सफारीला तडा गेला. या घटनेमुळे सर्व दुःखी, कष्टी झाले.

काळा आंबा परिसरात आला झटका

काळा आंबा परिसरात केशव बालगी यांना हृदय विकाराच्या झटका आला. त्यांना तात्काळ मासळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. केशव बालगी यांचा मृतदेह मुंबईला हलवण्यात आला. पर्यटकांच्या आनंदावर विरजण पडले. मोठ्या उमेदीने ते ताडोब्यात आले होते. पण, केशव बालगी यांचा मृतदेह त्यांनी परत न्यावा लागला.