Akola Aap | आपची आता विदर्भात मोर्चेबांधणी, अकोला मनपात मैदानात उतरणार; दीपक सिंगलांची माहिती

अकोला मनपा भ्रष्टाचाराचे माहेरघर आहे. पंतप्रधान आवास योजनेत शहरात मोठ्या प्रमाणात अनियमितता झाली आहे. तसेच शहरातील सहा रस्त्यांबाबत घोटाळा झाल्याचे सोशल ऑडिटमधून निष्पन्न झाले आहे. याबाबत आम आदमी पक्षाने आंदोलन सुद्धा केले आहे.

Akola Aap | आपची आता विदर्भात मोर्चेबांधणी, अकोला मनपात मैदानात उतरणार; दीपक सिंगलांची माहिती
अकोल्यात आपचे महाराष्ट्र प्रभारी दीपक सिंगला यांच्यासह पदाधिकारी.
Image Credit source: tv 9
| Edited By: | Updated on: Jun 17, 2022 | 2:08 PM

अकोला : घोटाळेबाजांचे शहर ओळखले जात आहे. मनपा भ्रष्टाचाराचे माहेरघर आहे. त्यामुळे येत्या महानगरपालिका निवडणुकीत आम आदमी पार्टी (Aam Aadmi Party) पूर्ण ताकदीनिशी निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे. पक्षाला एक संधी द्या अकोला भ्रष्टाराचारमुक्त करू असे आवाहन आम आदमी पक्षाचे दिल्लीचे नेते तथा माजी आमदार महाराष्ट्र प्रभारी दीपक सिंगला (Maharashtra in-charge Deepak Singh) यांनी केले. ते अकोल्यातातील शासकीय विश्रामगृह (Government Rest House in Akola) येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. आम आदमी पक्षाने जनतेच्या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देत प्रामाणिक विकासाच्या मुद्द्यावर दिल्लीसोबतच पंजाब राज्यात सुद्धा एकहाती सत्ता मिळवली. देशातील अन्य राज्यात पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी पक्ष झपाट्याने काम करत आहे. तोच एक भाग म्हणून दिल्लीत वरिष्ठ नेत्यांनी नेमलेले एक पथक विदर्भातील दहा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे.

अकोल्यात दिल्लीच्या दर्जाचे शिक्षण

गुरुवारी सांयकाळी अकोल्यात दाखल झाले. यावेळी प्रदेश प्रभारी दीपक सिंगला यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी दिल्लीतील सरकारी शाळांचा आवर्जून उल्लेख करत अकोल्यात त्या धर्तीवर शिक्षण देण्याचा प्रयत्न करू शिवाय मोफत पाणी देण्याचेही काम केले. एकंदरीत पक्षाच्या भूमिका त्यांनी जाहीर करत अकोला मनपा निवडणुकीमध्ये घोटाळेबाजांना हद्दपार करण्यासाठी एक संधी नागरिकांनी द्यावी, असे आवाहन यावेळी केले. पत्रकार परिषदेला प्रदेश निवडणूक प्रभारी महादेव नाईक, प्रदेशाध्यक्ष रंगा राचुरे, प्रदेश सचिव तथा प्रवक्ता धनंजय शिंदे आदी उपस्थित होते.

पीएम आवास योजनेत अनियमीतता

अकोला मनपा भ्रष्टाचाराचे माहेरघर आहे. पंतप्रधान आवास योजनेत शहरात मोठ्या प्रमाणात अनियमितता झाली आहे. तसेच शहरातील सहा रस्त्यांबाबत घोटाळा झाल्याचे सोशल ऑडिटमधून निष्पन्न झाले आहे. याबाबत आम आदमी पक्षाने आंदोलन सुद्धा केले आहे. मात्र सेक्शन 94 चा अहवाल आणखी मनपाने का प्रसिद्धी केला नाही, असा प्रश्नही पक्षाचे प्रदेश संघटक विजय कुंभार यांनी केला. तर येत्या निवडणुकीत हाच मुद्दा घेवून आम आदमी पक्ष जनतेसमोर येणार आहे.