‘वरुणराजा एकदाचा बरस’, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कृषिमंत्री दादा भुसेंचं परमेश्वराला साकडं

| Updated on: Jul 10, 2021 | 3:14 PM

मातीशी घट्ट नातं असलेले राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी धुळे व नंदुरबार जिल्हा दौऱ्यात शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाऊन अडीअडचणी समजून घेतल्या. (Agriculture Minister Dadaji bhuse Nandurbar Dhule Visit)

वरुणराजा एकदाचा बरस, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कृषिमंत्री दादा भुसेंचं परमेश्वराला साकडं
कृषिमंत्री दादाजी भुसे
Follow us on

धुळे : मातीशी घट्ट नातं असलेले राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे (Dadaji Bhuse) यांनी धुळे व नंदुरबार जिल्हा दौऱ्यात शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाऊन अडीअडचणी समजून घेतल्या. पावसाने ओढ दिल्याने शेतकरी काहीसे चिंतातूर पाहायले मिळाले. कृषीमंत्र्यांनी थेट बांधावरुनच पाऊस पडू दे म्हणून परमेश्वराला साकडं घातलं. राज्याचे कृषी मंत्री थेट शेतकर्‍यांशी भेटीगाठी करून चर्चा करत असल्याने शेतकऱ्यांना आश्चर्याचा सुखद धक्का मिळाला. (Agriculture Minister Dadaji bhuse Nandurbar Dhule Visit)

कृषीमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर

नाशिक धुळे व नंदुरबार जिल्ह्यात पावसाच्या लपंडावामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट येऊन ठेपले आहे या जिल्ह्यात पाऊस कमी झाल्याने पिकांची देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे कृषी मंत्री दादा भुसे यांनी आज खानदेशातील या जिल्ह्यात दौरा सुरू केला आहे. त्यांनी थेट शेतकऱ्यांशी चर्चा करत कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनाबाबत माहिती देत शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेतल्या आहेत.

पाऊस बरसू दे, कृषीमंत्र्यांचं परमेश्वराला साकडं

पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढावलं आहे. अशा वेळी त्यांनी पाऊस येऊ दे म्हणून परमेश्वराकडे साकडं घातलं. शेतकऱ्यांवर दुबारा पेरणीचे संकट आले शेतकऱ्यांनी खचून न जाता हिम्मत धरावी राज्य सरकार तुमच्या पाठीशी आहे. तुम्हाला खते बी-बियाणे संदर्भात वेळोवेळी मार्गदर्शन केले जाईल, असा दिलासा देखील कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिला आहे

स्वत:चा रुमाला शेतकऱ्याला मास्क म्हणून दिला

कृषी मंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान एका शेतकऱ्याच्या तोंडाला मास्क नव्हता. कोरोना परिस्थितीचं भान बाळगून असलेल्या दादाजी भुसे यांनी स्वत:च्या खिशातला हातरुमाल शेतकऱ्याला मास्क म्हणून दिला. यावेळी उपस्थित शेतकरी कृषीमंत्र्यांकडे एकटक पाहत राहिले. कृषीमंत्र्यांच्या कृतीची मात्र शेतकऱ्यांमध्ये एकच चर्चा रंगली होती.

(Agriculture Minister Dadaji bhuse Nandurbar Dhule Visit)

हे ही वाचा :

मोठी बातमी, इफकोचा नॅनो यूरीया राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार, इफकोनं महाराष्ट्रात यावं, दादा भुसेंचं आवाहन

IFFCO च्या नॅनो लिक्विड यूरियाचं व्यावसायिक उत्पादन सुरु, गुजरातमधून पहिली खेप ‘या’ राज्याकडे रवाना

इफकोकडून शेतकऱ्यांना खरिप हंगामापूर्वी गिफ्ट, नॅनो युरिया लाँच, पैसेही वाचणार