या यात्रेचं वैशिष्ट्ये म्हणजे गाढवांचा बाजार; येथील गाढवांना जास्त मागणी

| Updated on: Mar 12, 2023 | 4:03 PM

रंगपंचमीच्या दिवशी गाढवांचा बाजार भरवला जातो. या बाजारात देश भरातून गाढव विक्रीला आणली जातात. राजस्थान, गुजरात, आंध्रप्रदेश, कर्नाटक राज्यातूनही व्यापारी आणि गाढव खरेदी करणारे ग्राहक मढीत येतात.

या यात्रेचं वैशिष्ट्ये म्हणजे गाढवांचा बाजार; येथील गाढवांना जास्त मागणी
Follow us on

अहमदनगर : पाथर्डी तालुक्यातील भटक्यांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मढीची यात्रा सध्या सुरुय. होळीपासून या यात्रेला सुरवात होते. गुडीपाडव्यापर्यंत यात्रा उत्सव चालतो. रंगपंचमी हा यात्रेचा मुख्य दिवस असतो. यादिवशी राज्यभरातून भाविक नाथांच्या दर्शनाला येतात. तर गाढवांचा बाजार या यात्रेच मुख्य आकर्षण असते. मढी गाव जरी छोट असलं तरी देशभरात ओळख आहे. रंगपंचमीच्या दिवशी अठरापगड समाज्याच लोक नाथांच्या दर्शनासाठी येतात. तसेच होळीच्या दिवशी कानिफनाथ महाराजांच्या मुख्य समाधी मंदिरच्या कळसाला कैकाडी समाजाच्या मनाची काठीची भेट देऊन यात्रोत्सवास सुरुवात करण्यात येतेय. यावेळी परंपरेप्रमाणे डफाच्या वाद्याच्या गजरात आणि नाथांचा जयघोष करण्यात येतो. कानिफनाथाच्या कळसाला मानाच्या काठ्या लावल्या जातात. या काठ्या वाजत गाजत आणल्या जातात.

कानिफनाथांच्या संजीवन समाधीचे दर्शन

विशेष म्हणजे या काठ्यांचा पहिला मान कैकाडी समाजाला दिला जातो. तर गेल्या सातशे वर्षांपासून कैकाडी समाज्याच्या परंपरा चालत आली. कैकाडी समाजाने मढी गडाच्या निर्मितीकरता टोपल्या विणून दिल्या. तसेच गड उभारणीसाठी योगदान दिल्याबदल हा काठीचा प्रथम मान गेल्या अनेक वर्षांपासूनचा चालू आहे.श्री क्षेत्र मढी येथील कानिफनाथांच्या संजीवन समाधीचा सोहळा रंगपंचमीलाच्या दिवशी साजरा केला जातो. रंगपंचमीच्या दिवशी देश भरातून भाविक यात्रेला येत असतात. कानिफनाथांच्या संजीवन समाधीचे दर्शन लाखो नाथ भक्तांनी घेतले.

हे सुद्धा वाचा

गाढवाची किंमत किती?

यावेळी चैतन्य कानिफनाथ महाराज की जयघोषच्या घोषणेने संपूर्ण मढीगड दुमदुमून गेला होता. नऊ नाथांपैकी एक असलेल्या कानिफनाथांची संजीवन समाधी म्हणून या गडाची ओळख आहे. रंगपंचमी या दिवशी कानिफनाथ महाराजांचा समाधी दिन म्हणून साजरा केला जातो.नाथांचा असलेला प्रसाद रेवडी, मलिदा, नारळ भाविक घेऊन समाधीवर अर्पण करतात. महत्त्वाचे म्हणजे याठिकाणी गाढवांचा बाजार प्रसिध्द आहे.

दरवर्षी रंगपंचमीच्या दिवशी गाढवांचा बाजार भरवला जातो. या बाजारात देश भरातून गाढव विक्रीला आणली जातात. राजस्थान, गुजरात, आंध्रप्रदेश, कर्नाटक राज्यातूनही व्यापारी आणि गाढव खरेदी करणारे ग्राहक मढीत येतात. या बाजारात गुजरातच्या गाढवांना जास्त मागणी असते. काठेवाड, गावरान दोन जातीचे गाढवांचा प्रामुख्याने खरेदी विक्रीचा बाजार अनेक वर्षांपासून आजपर्यंत चालू आहे. त्यामुळे गाढवांचा बाजार हे मुख्य आकर्षण ठरले जात. ५० हजारांपासून ते एक लाख रुपयांपर्यंत गाढवाच्या किमती असतात.