Rahul Gandhi: राहुल गांधी यांचे नाव आणि फोटो येताच सोशल मीडिया पोस्ट ब्लॉक? काँग्रेस पदाधिकाऱ्यांची पोलिसांकडे धाव, प्रकरण काय?

Dharashiv Congress on Rahul Gandhi Social Media: देशात मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयकावरून गदारोळ सुरू असतानाच धाराशिवमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी एक अजब दावा केला आहे. केवळ आरोप करून कार्यकर्ते थांबलेले नाहीत तर त्यांनी थेट पोलीस अधिक्षकांची भेट घेत तक्रार दिली आहे.

Rahul Gandhi: राहुल गांधी यांचे नाव आणि फोटो येताच सोशल मीडिया पोस्ट ब्लॉक? काँग्रेस पदाधिकाऱ्यांची पोलिसांकडे धाव, प्रकरण काय?
राहुल गांधी यांचा फोटो येताच सोशल मीडिया पोस्ट ब्लॉक? प्रकरण काय?
| Updated on: Nov 28, 2026 | 10:59 AM

Dharashiv Congress on Rahul Gandhi Social Media: देशात सध्या मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयकावरून गहजब उडाला आहे. कोण कोणाच्या गोटात यावरून गदारोळ उडाला आहे. त्याचवेळी धाराशिवमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी एक अजब दावा केला आहे. केवळ आरोप करून कार्यकर्ते थांबलेले नाहीत तर त्यांनी थेट पोलीस अधिक्षकांची भेट घेत तक्रार दिली आहे. राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ पोस्ट केल्यानंतर सोशल मीडिया खाती बंद करण्यात आल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला आहे. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांना निवेदन दिले आहे.

समर्थनार्थ पोस्ट केली की सोशल मीडिया खातं बंद

Loading...

राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ पोस्ट केल्यानंतर सोशल मीडिया खाती बंद करण्यात आल्याचा आरोप धाराशिव जिल्हा काँग्रेसने केला आहे. मुरूम येथील ‘स्वच्छ मुरूम अभियान’ चे इन्स्टाग्राम खाते, तसेच काँग्रेसचे जिल्हा सचिव राजकुमार हिरेमठ यांचे फेसबुक खाते आणि यूट्यूब चॅनेल अचानक बंद झाल्याने काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रकरणी मुरूम पोलीस ठाण्यासह जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या अजब प्रकारामुळे पदाधिकारीही चक्रावले आहेत.

बंद खाती लागलीच सुरू करा

बंद करण्यात आलेली सोशल मीडिया खाती तातडीने पूर्ववत सुरू करावीत, तसेच या कारवाईमागील कारणांची निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशाराही काँग्रेसचे जिल्हा सचिव राजकुमार हिरेमठ यांनी दिला आहे. याप्रकरणी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांना निवेदन दिले आहे. सध्या जिल्ह्यात या विषयावर जोरदार चर्चा सुरू आहे.

यापूर्वी राहुल गांधी यांच्या पोस्ट फेसबूक थेट ब्लॉक करत असल्याची तक्रार काँग्रेसच्या वरिष्ठांनीही केली आहे. इंडियन युथ काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव मनु जैन यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याप्रकरणी याचिका दाखल केली होती. मेटाच्या या कारभाराविरोधात त्यांनी दाद मागितली. तर सोशल मीडियाशी संबंधित महत्त्वाच्या नियमाला हायकोर्टात आव्हान दिलेले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us