आता तरी जागेवर या… शिक्षक आणि पदवीधर निकालानंतर शिंदे सेनेच्या बड्या नेत्याने भाजपला डिवचले

Chandrakant Raghuvanshi on BJP: शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील पराभवाचे कवित्व अद्याप संपलेले नाही. त्यातून शिंदे सेना आणि भाजपमधील कुरघोड्या सुरूच आहे. दोन्ही पक्षातील नेते एकमेकांवर तोंडसुख घेत आहेत. त्यात उत्तर महाराष्ट्रातील नेत्याने सुद्धा तोफ डागली आहे.

आता तरी जागेवर या... शिक्षक आणि पदवीधर निकालानंतर शिंदे सेनेच्या बड्या नेत्याने भाजपला डिवचले
आता तरी जागेवर या... शिक्षक आणि पदवीधर निकालानंतर शिंदे सेनेच्या बड्या नेत्याने भाजपला डिवचले
| Updated on: Nov 01, 2026 | 8:28 AM

Chandrakant Raghuvanshi on Shivsena- BJP: विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर निकालावरून महायुतीत शिमगा सुरू आहे. एकनाथ शिंदे सेना आणि भाजपमध्ये कलगीतुरा रंगला आहे. एकीकडे रविंद्र धंगेकर, निलेश राणे यांनी मोर्चा सांभाळला आहे. तर नवनाथ बन, प्रवीण दरेकर यांनी फायरिंग सुरू ठेवलेले आहे. या हाराकिरीतून दोन्ही पक्षातील किरकिरी चव्हाट्यावर आली आहे. दोन्ही पक्षातील नेते एकमेकांवर तोंडसुख घेत आहेत. त्यात उत्तर महाराष्ट्रातील नेत्याने सुद्धा तोफ डागली आहे.

आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची टीका

Loading...

शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी हे गेल्या काही दिवसांपासून भाजपविरोधात शड्डू ठोकून आहेत. यापूर्वी त्यांनी शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त करताना भाजपला पाण्यात पाहिले होते. रघुवंशी यांनी पुन्हा एकदा भाजपला डिवचले आहे. भाजपने आता जागेवर आले पाहिजे, विधान परिषदेच्या निवडणुकीतून जनतेने हाच संदेश दिला आहे. भाजपच्या नेत्यांनी जागेवर राहून एकनाथ शिंदे यांच्याबद्दल बोलावे. आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचा भाजपच्या नेत्यांवर असा तिखट प्रहार केला आहे.

दुय्यम वागणुकीवरून सुनावले

डबल इंजिनचे सरकार आता फार झाले, शिवसेनेला दुय्यम वागणूक देऊन भाजप निवडणुका जिंकू शकत नाही. हे विधान परिषदेच्या निवडणुकीतून सिद्ध झाले आहे. त्यामुळे शिवसेनेला सन्मानाची वागणूक दिली पाहिजे. मित्रपक्षांनी हे शिकले पाहिजे आणि भाजपनेही यातून बोध घेतला पाहिजे, अशी जोरदार टीका आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी भाजपवर केली.

शिंदे यांच्यामुळे महायुतीला बळ

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विधानसभेची निवडणूक झाल्यामुळेच महायुतीला एवढे बळ मिळाले, हे मान्य करावे लागेल. महायुतीला एवढे बळ मिळाल्यानंतरच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. शेवटी कोणाच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवल्या जात आहेत, हे महत्त्वाचे आहे, असा टोलाही आमदार रघुवंशी यांनी लगावला. विधान परिषदेच्या निवडणूक निकालानंतर महायुतीमधील धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. या वादात दुखावलेले अनेक नेते आता व्यक्त होत आहेत. एकमेकांवर ते निशाणा साधत आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us