दहीहंडीसाठी मुख्यमंत्र्यांना फोनवर विनवणी, पारंपारिक दहीहंडीला परवानगी न दिल्यास आंदोलन,आशिष शेलारांचा इशारा

| Updated on: Aug 23, 2021 | 3:20 PM

भाजप नेते आशिष शेलार सध्या दोन दिवसांच्या सोलापूर दौऱ्यावर आहेत. जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचं सोलापूरमध्ये जंगी स्वागत केलं. आशिष शेलारांनी यावेळी पत्रकारांशी संवाद साधला.महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर त्यांनी जोरदार टीका केली.

दहीहंडीसाठी मुख्यमंत्र्यांना फोनवर विनवणी, पारंपारिक दहीहंडीला परवानगी न दिल्यास आंदोलन,आशिष शेलारांचा इशारा
आमदार आशिष शेलार, भाजप
Follow us on

सोलापूर: भाजप नेते आशिष शेलार सध्या दोन दिवसांच्या सोलापूर दौऱ्यावर आहेत. जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचं सोलापूरमध्ये जंगी स्वागत केलं. आशिष शेलारांनी यावेळी पत्रकारांशी संवाद साधला.महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर त्यांनी जोरदार टीका केली. तर, दहीहंडी उत्सवाच्या विषयी विचारले असता आशिष शेलार यांनी कमी उंचीच्या दहीहंडीला राज्य सरकारननं परवानगी दिली नाही तर आंदोलन करु असा इशारा दिला.

आशिष शेलार नेमकं काय म्हणाले?

दहीहंडी उत्सव कोरोनाच्या कारणामुळे करू नका अशी सरकारची भूमिका आहे. मात्र मी स्वतः मुख्यमंत्र्यांना पहिल्यांदा दहीहंडीच्या विनवणी साठीच फोन केलाय. दोन डोस झालेल्या आणि प्रमाणपत्र असलेल्या जास्त उंच नसलेला असा पारंपारिक पद्धतीने दहीहंडी उत्सव आम्हाला करू द्या, अशी भूमिका त्यांच्यासमोर मांडलेली आहे. पारंपारिक कमी गर्दीच्या, कमी उंचीच्या दहीहंडीला परवानगी दिली पाहिजे जर नाही दिली तर सरकारच्या विरोधात आंदोलन करणार असल्याचंही यावेळी आशिष शेलार माध्यमांशी बोलताना सांगितलं.

मंत्र्यांची मुलं सुरक्षित जनता असुरक्षित

जादूटोणा केल्याच्या कथित कारणामुळं चंद्रपूर इथे झालेल्या सामूहिक मारहाणीबद्दल आशिष शेलार यांनी भाष्य केलं. महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये लोकांचे जीव असुरक्षित असून सुरक्षा फक्त नेत्यांच्या मुलांची वाढली आहे. महिलावर, बालकांवर अत्याचाराच्या घटना वाढत आहेत.पोलिसांवरचा सरकारचा वचक निघून गेलाय. पोलिसांच्या आपापसातील गटबाजीमुळे ते आतून पोखरून गेले आहेत ,सामान्य माणसांचा जीव असुरक्षित झाला आहे ,कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न सरकारने गांभीर्याने घेण्याची हात जोडून विनंती करतो असही शेलार म्हणाले.

भाजपकडून फटाक्यांच्या आतिषबाजीत स्वागत

आशिष शेलार सध्या दोन दिवसीय सोलापूर दौऱ्यावर असून या दोन दिवसांत भाजपच्या विविध कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन संघटनात्मक विषयांवर त्यांच्या बैठका आहेत. आज सोलापुरात त्यांचं आगमन झाले त्यावेळी छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याजवळ भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे फटाक्यांच्या अतिषबाजीत स्वागत केले.

इतर बातम्या:

Narayan Rane | 32वर्षांचा पापाचा घडा फुटल्याशिवाय राहणार नाही, नारायण राणेंचा शिवसेनेवर हल्लाबोल

‘मी कायद्याचं पालन करतो, जेव्हा हवं तेव्हा ईडीला सामोरं जाईन’, अनिल देशमुखांची भूमिका

Dahi Handi : जीव वाचवण्यासाठी सण-वार काही काळ बाजूला ठेवू, मुख्यमंत्र्यांचं गोविंदा पथकांना आवाहन

BJP leader Ashish Shelar said he call Uddhav Thackeray for appeal permission to Traditional Dahi Handi Celebrations