AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dahi Handi : जीव वाचवण्यासाठी सण-वार काही काळ बाजूला ठेवू, मुख्यमंत्र्यांचं गोविंदा पथकांना आवाहन

जनतेच्या आरोग्याला प्राधान्य देऊन, त्यांचे प्राण वाचविण्यासाठी आपण सण -वार, उत्सव काही काळासाठी बाजूला ठेऊ, मानवता दाखवू आणि कोरोनाला पहिले हद्दपार करू असा संदेश महाराष्ट्राने जगाला द्यावा, अशी संयमी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली.

Dahi Handi : जीव वाचवण्यासाठी सण-वार काही काळ बाजूला ठेवू, मुख्यमंत्र्यांचं गोविंदा पथकांना आवाहन
CM Uddhav Thackeray meet Dahi Handi mandal
| Edited By: | Updated on: Aug 23, 2021 | 2:06 PM
Share

मुंबई : दहीहंडी सण थाटामाटात साजरा करण्यायासाठी शासनाने परवानगी द्यावी नाहीतर आम्ही आंदोलन करु, अशी आक्रमक भूमिका दही मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि विरोधी पक्ष भाजपने घेतली. त्यावर जनतेच्या आरोग्याला प्राधान्य देऊन, त्यांचे प्राण वाचविण्यासाठी आपण सण -वार, उत्सव काही काळासाठी बाजूला ठेऊ, मानवता दाखवू आणि कोरोनाला पहिले हद्दपार करू असा संदेश महाराष्ट्राने जगाला द्यावा, अशी संयमी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी घेतली.

सणांसंबंधी आपल्या सर्वांच्या भावना सारख्याच आहेत. आपले सण आपण जपलेच पाहीजेत… पण आता प्रश्न आरोग्याचा आहे. याचा विचार करता आपल्याला आरोग्याचा विचारच प्राधान्यांना करावा लागेल, असं म्हणत एकप्रकारे दहीहंडी साजरा करण्यावर निर्बंध असतील किंबहुना दहीहंडीसाठी परवानगी नसेल, असे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

महाराष्ट्रातल्या गोविंदा पथकांच्या प्रतिनिधीसमवेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व्हिडीओ कॉन्फर्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी गोविंदा पथकांच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांकडे 5 मागण्या केल्या.

गोविंदा पथकांच्या प्रतिनिधींच्या मुख्यमंत्र्यांकडे 5 मागण्या

१) आम्हाला आमच्या जागेवरची मानाची दहीहंडी फोडण्यास परवानगी मिळावी. २) दहीहंडी फोडताना मानवी मनोरे उभारण्यासाठी सर्व गोविदांचे दोन्ही लसीकरण पुर्ण करणे आवश्यक आहे. तशी तयारी गोविंदा पथकांनी केली आहे. ३) गोविंदा पथक हे दुसरीकडे कोठेही दहीहंडी फोडण्यासाठी जाणार नाहीत. ४) कोविड १९ संसर्गाची जाणिव ठेवुनच सुरक्षित दहीहंडी उत्सव आम्हाला आमच्या जागेवरच करण्याची परवानगी द्यावी. ५) दहीहंडी फोडताना कोणतीही गर्दी होणार नाही याची काळजी गोविंदा मंडळं घेतील.

आपण जर समजूतीने वागलो नाही तर धोका अटळ

बाळ गोपाळांचा हा उत्सव आहे… गेल्या वर्षी पासून जी लहान बालकं अनाथ झालेली आहेत… त्यांची काय अवस्था आहे हे आपण पहावं… लस घेतल्यावर देखील काही देशात लाँकडाऊन करण्यात आलंय… इस्त्रायलने तर पुन्हा मास्क घालायला सुरवात केलीय… अर्थ चक्र चालवण्यासाठी आपण थोडी शिथिलता दिली आहे… कारण अनेकांची हातावर पोट आहेत.. त्यांच्यासाठी आपण हा निर्णय घेतलांय… आपण जर समजूतीने वागलो नाही तर धोका अटळ आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

जनतेचे प्राण वाचवायचे असतील तर संस्कृती देखील समजूतीने घ्यावी लागेल

एकदा हे संकट पुर्णपणे घालवूयात… आपण यंत्रणेत कुठेही ढिलाई होऊ देत नाही आहोत. नीती आयोगाने जे सांगितलंय.. ते लक्षात घेतलं पाहीजे… गेल्या दीड वर्षात आपण जी आरोग्य सेवा वाढवलीय ती इतर कोणत्याही राज्याने वाढवलेली नाहीये.आपण दूसर्या लाटेत डाँक्टरांच्या मेहनतीमुळे बाहेर पडलोय… आता जी विंडो आपल्याला मिळालीय… तीचा वापर आपण थोडं अर्थ चक्र सावरण्यासाठी करूयात. पुन्हा ती काळरात्र नकोय… जनतेचे प्राण वाचवण्यासाठी आपण आपली संस्कृती परंपरा देखील काहीवेळ समजूतीने घ्याव्या लागतील. गर्दी टाळण्यासाठी आपल्याला सुरक्षेचे पाऊल उचलावं लागेल, असं मुख्यमंत्री म्हणाले.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.