VIDEO | पुलावरील पाण्याच्या प्रवाहात वाहून जाताना महिला थोडक्यात बचावली

| Updated on: Jun 17, 2021 | 3:34 PM

नदीवर असलेल्या पुलावरुन जाताना एक महिला पाण्यात पडली आणि वाहून जायला लागली. मात्र ग्रामस्थांनी त्या महिलेला पकडल्यामुळे तिचे प्राण वाचले. ही घटना कॅमेरात कैद झाली

VIDEO | पुलावरील पाण्याच्या प्रवाहात वाहून जाताना महिला थोडक्यात बचावली
पावसाच्या पाण्यात महिला वाहून जाताना वाचली
Follow us on

बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यात काल सायंकाळी मुसळधार पाऊस पडल्यामुळे अनेक ठिकाणी नदी-नाल्यांना पूर आला. पुलावरुन जाताना पाण्याच्या प्रवाहात वाहून जाताना महिला थोडक्यात बचावली. ग्रामस्थांनी प्रसंगावधान दाखवल्यामुळे महिलेचे प्राण वाचले. ही घटना कॅमेरात कैद झाली आहे. (Buldana woman saved from drowning in rain flood water)

…आणि महिला पाहता पाहता पाण्यात पडली

बुलडाणा जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूर आला, तर बऱ्याच ठिकाणी शेतीचे नुकसान झाले. चिखली तालुक्यातील उंद्रीसह चिंचपूर परिसरातही मुसळधार पाऊस झाला. चिंचपूर गावाजवळ असलेल्या नदीला मोठा पूर आला होता. यावेळी नदीवर असलेल्या पुलावरुन जाताना एक महिला पाण्यात पडली आणि वाहून जायला लागली.

पूल बांधण्यासाठी गावकऱ्यांचा जोर

याच वेळी ग्रामस्थांनी त्या महिलेला पकडल्यामुळे तिचे प्राण वाचले. चिंचपूर गावात प्रवेशाच्या एकमेव रस्त्यावरुन पुराचे पाणी नेहमीच गावकऱ्यांचा रस्ता अडवते. सुदैवाने दुर्घटना होण्यापासून वाचली. या ठिकाणी पुलाची मागणी अगोदरही करण्यात आलेली आहे. इथे लवकरात लवकर पूल बांधावा यासाठी गावकरी पुन्हा जोरदार मागणी करत आहेत.

पाहा व्हिडीओ :